महाराष्ट्र

कासव माझी प्रेरणा, पण कामाची गती सशाची

देवेंद्र फडणवीस : धोका आला की कवचात जातो, पुन्हा बाहेर येतो!

मुंबई/नागपूर । प्रतिनिधी
कासव माझी प्रेरणा आहे. मात्र, माझा कामाचा स्पीड कासवाचा नाही, तर सशाचा आहे. धोका आला किंवा कुणी दगड मारला की, कासव कवचात जाते आणि पुन्हा बाहेर येते. दिवसभर भेटणारे नागरिक, राज्यात उद्योग सुरू करणारे उद्योजक, तसेच माझ्या परिवारात पत्नी आणि मुलगी हे आपल्याला सातत्याने काम करण्यासाठी ऊर्जा देतात, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.
नागपूरमधील बुट्टीबोरी औद्योगिक वसाहतीतील ’आवाडा ग्रुप’ कॅम्पसमध्ये आयोजित उद्योजकांशी संवाद कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही दिलखुलास मुलाखत दिली. नागपूरमधील सामाजिक संबंधांचा संदर्भ देताना फडणवीस म्हणाले की, नागपूरमध्ये घराचा पत्ता सांगताना अनेकदा ‘कोण कोणाच्या घराजवळ राहतो’ याचा आधार घेतला जातो. मुख्यमंत्री झाल्यानंतरही आपले अनेक मित्र आपल्याकडे मुख्यमंत्रिपदाच्या दृष्टिकोनातून पाहत नाहीत, असे त्यांनी सांगितले. हे बरोबर नाही, अशा स्पष्ट शब्दांत आपल्याला सांगणारे अनेक लोक आहेत, असेही त्यांनी नमूद केले. मोठ्या पदावर गेल्यानंतर अनेक जण स्वतःबद्दलची टीका किंवा चुकीच्या गोष्टी ऐकून घेण्याची तयारी ठेवत नाहीत. मात्र, आपण अशा प्रत्येक गोष्टी ऐकण्यास तयार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. आपल्या हातून झालेल्या चुका किंवा चुकीच्या गोष्टीही लोकांनी निदर्शनास आणून दिल्या पाहिजेत, अशी आपली भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महायुती सरकारच्या कामकाजाबाबत बोलताना फडणवीस यांनी सहयोगी पक्षांच्या सहकार्याचा उल्लेख केला. एखादे काम पूर्ण मनापासून हाती घेतले तर सहयोगी पक्ष मदतीला येतात, असे ते म्हणाले. समृद्धी महामार्ग उभारण्याचा निर्णय घेतला, तेव्हा महायुतीतील सहयोगी पक्षांनी आपल्याला सहकार्य केल्याचे त्यांनी सांगितले. समृद्धी महामार्गाच्या उभारणीदरम्यान झालेल्या राजकीय विरोधाचाही फडणवीस यांनी उल्लेख केला.
मुंबईतील आगामी पायाभूत सुविधांच्या कामांबाबतही त्यांनी भूमिका मांडली. वेस्टर्न एक्स्प्रेस वेच्या समांतर आणखी एक रस्ता तयार करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. ठाणे-बोरीवलीदरम्यान नवा मार्ग आणि भुयारी मार्ग उभारण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. याशिवाय बुलेट ट्रेन आणि मुंबई विमानतळ यांना जोडण्याच्या दृष्टीनेही काम केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

‘तिसरी मुंबई’ विकसित होतेय
मुंबईतील प्रवासाचा वेळ कमी करणे हे या प्रकल्पांमागील उद्दिष्ट असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. मुंबईत कोणत्याही ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी सुमारे 45 मिनिटांत पोहोचता यावे, असा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर मुंबईच्या विस्ताराच्या दृष्टीने ‘तिसरी मुंबई’ विकसित करण्याचे काम सुरू असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी या मुलाखतीत नमूद केले.

सर्व विरोधकांचे तोंड बंद
फडणवीस यांनी सांगितले की, शरद पवार यांनी समृद्धी प्रकल्पाला विरोध केला होता. उद्धव ठाकरे यांनीही त्यावेळी विरोध केला होता, जरी ते त्या काळात महायुतीचा भाग होते, मात्र, आपण आपल्या ध्येयावर ठाम राहून काम सुरू ठेवले. एका वर्षात जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचे सांगत, सुरुवातीला प्रकल्पावर टीका करणारे लोक आज त्याचे कौतुक करत असल्याचा दावा त्यांनी केला. सगळ्या विरोधकांचे तोंड बंद झाले, असेही फडणवीस म्हणाले.

The tortoise is my inspiration, but my work pace is that of a hare.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

7 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

7 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

7 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

7 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

7 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

7 hours ago