आज आषाढी एकादशी या दिवशी मोठ्या संख्येने अनेक वारकरी हे विठ्ठलाच्या भेटीसाठी व विठ्ठलाच्या दर्शनासाठी आसूस होऊन पंढरपुरात येतात. वारकरी संप्रदायामध्ये प्रामुख्याने आषाढी एकादशीला विशेष महत्त्व आहे. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणार्या या एकादशीला आषाढी एकादशी असे म्हणतात. तसेच आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हणतात.
देवशयनी एकादशी म्हणजे धार्मिक मान्यतेनुसार मनुष्याचं एक वर्ष हे देवांची एक अहोरात्र असते. दक्षिणायन ही देवांची रात्र असते तर उत्तरायण हा दिवस असतो. या काळात दक्षिणायनाला सुरुवात होते. त्यामुळे या काळात देव झोपी जातात असे म्हटले जाते तसेच असुर प्रबळ होतात आणि त्यांच्या शक्तींपासून सुरक्षित राहण्यासाठी हे व्रत करणे आवश्यक असते तसेच या दिवशी भगवान विष्णूची पूजा करणे यालादेखील खूप महत्त्व आहे.
वारकरी संप्रदायाचा सर्वांत मोठा उत्सव म्हणजे आषाढी एकादशी. आषाढी एकादशी म्हटलं की लगेच आपल्यासमोर ‘टाळ’, ‘मृदंग’ तसेच डोक्यावर तुळशी वृंदावन घेणार्या बायका गळ्यात तुळशी माळ घालणारे विठ्ठलभक्त आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात तसेच हे विठ्ठलभक्त मैलोन्मैल पायी चालत येतात. या दिवसांत पावसाला देखील खूप उधाण आलेलं असतं तरीदेखील कशाचीही पर्वा न करता हे वारकरी विठ्ठलाच्या ओढीसाठी कितीही चालतात.
अनेक वर्षांपासून चालत आलेल्या या वारीमध्ये विविध जातीचे, पंथाचे लोक एकत्र येऊन एकमेकांना सहाय्य करतात तसेच पायी चालताना विठ्ठलाच्या भक्तीत दंग होऊन संत ज्ञानेश्वर व संत तुकोबांच्या अभंगाच्या तालावर पावले टाकत लाखो वारकरी खांद्यावर पालखी घेऊन चालत असतात. यामध्ये आळंदीहून संत ज्ञानेश्वर माउलींची तर देहू येथून संत तुकाराम महाराजांची तसेच त्र्यंबकेश्वरवरून निवृत्तिनाथांची आणि पैठणहून संत एकनाथांची पालखी घेऊन पंढरपुरात येतात तसेच या दिवशी चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतले जाते. जी लोक वारीला जाऊ शकत नाहीत अशी लोक या दिवशी उपवास करून घरीच विठ्ठलाची मनोभावे पूजा करतात.
The Yearning to Meet
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…