संपादकीय

जेव्हा नव्हते चराचर । तेव्हा होते पंढरपूर ॥

– शिवाजी चौगुले

आषाढी एकादशी म्हटले की डोळ्यासमोर येते ती पंढरपूरची वारी! वर्षभरातील चोवीस एकादशांमध्ये या एकादशीचे एक विशेष महत्त्व आहे. या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. आषाढी एकादशीचे वारकरी संप्रदायामध्ये एक विशेष महत्त्व आहे.
आषाढ मासाच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी (देवांच्या निद्रेची) आणि वद्य पक्षातील एकादशीला कामिका एकादशी असे म्हणतात. आषाढी एकादशीचा इतिहास याप्रमाणे धार्मिक ग्रंथांमध्ये आढळतो. पूर्वी देव आणि दानव यांच्यात युद्ध पेटले.कुंभ दैत्यांचा पुत्र मृदूमान्य दैत्याला ठार मारले. ही जी शक्तीदेवी तीच एकादशी देवता आहे. आषाढी एकादशी व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. कामिका एकादशी ही मनोकामना पूर्ण करणारी एकादशी आहे. ही पुत्रदायी एकादशी आहे. ही एकादशी व्रत करण्याची प्रथा ही सांगितली आहे ती म्हणजे आदल्या दिवशी दशमीला एकभुक्त रहायचे. एकादशीला प्रात:स्नान करायचे.तुलसी विष्णूपूजन करायचे. हा संपूर्ण दिवस उपवास करायचा. रात्री हरिभजन करत जागरण करायचे. आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करायची आणि पारणे सोडायचे. या दोन्ही दिवशी श्रीधर या नावाने श्रीविष्णूची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधी करतात. एकावर एक अकरा म्हणजे एकादशी याचा अर्थ एकत्व सोडू नये. या दिवशी लंघन करणे, उपवास करणे, याचा उद्देश आहे. लक्ष तिकडे न जाता भगवंताकडे राहावे. मात्र, आता हा अर्थ गौण झाला आहे. आणि उपवास प्रधान झाला आहे. या दिवशी तत्त्व साधना करण्याला अनुकूल असते.एकादशी प्रतिदिनच केली पाहिजे. मात्र, एक दिवस योग्य तर्‍हेने केल्यास त्याचा प्रभाव पंधरा दिवस टिकतो. म्हणून एका महिन्यात दोन एकादशी असतात.
पंढरीच्या वारीचे एक विशेष महत्त्व आहे. अदृश्य भगवंताच्या अस्तित्वाचा एक भक्कम पुरावा म्हणजे पंढरपूर! वैकुंठभुवनाच्या आधीपासून पंढरपूर अस्तित्वात आहे. त्यामुळे पृथ्वीवरील सर्वांत पुरातन तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूराचा उल्लेख केला जातो. पृथ्वीवरील केवळ दोनच तीर्थक्षेत्रे सर्व पाप नाश करणारी आहे. एक म्हणजे काशी आणि दुसरे पंढरपूर.कारण या क्षेत्राचा अविनाशी तत्त्व असा महिमा भगवान शंकर आणि विष्णू यांनी आपल्या अखंड वास्तव्याने कथन केला आहे.
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल!
करावा विठ्ठल जीवभाव !!
या अभंगाची प्रचीती आज प्रत्येक वारकरी आणि विठ्ठल भक्त घेत नित्यनेमाने घेत असतात. नव्हे तर पंढरीचा पांडुरंग हा वारकर्‍यांचा श्वास आहे. त्याच्या नामाविना त्यांचे कोणतेच कर्म होत नसते. अशा भगवध्दक्त असलेल्या वारकर्‍यांचा महासंगम पंढरपूर यात्रेच्या म्हणजेच वारीच्या निमित्ताने होत असतो. म्हणून संत वचनाप्रमाणे म्हणावे वाटते, लागला टकळा पंढरीचा !! पंढरीची वारी ही महाराष्ट्राची सुमारे 800 ते 1000 वर्षांहून जुनी आणि जगातील सर्वांत मोठी सामुदायिक पायी पदयात्रा आहे. यात वारकरी दरवर्षी मोठ्या संख्येने सहभागी होऊन एकप्रकारे पर्वणीच साजरी करतात. विठ्ठलनामात दंग होऊन नाचतात.
वारीचा इतिहास आणि परंपरा :
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आधी त्यांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी हेदेखील नियमितपणे पंढरीची वारी करत असत.त्यानंतर ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तिनाथ, सोपानकाका, मुक्ताई, संत तुकाराम महाराज यांच्या काळापासून वारीची परंपरा अधिक बळकट झाली. हे संत आणि त्यांचे अनुयायी पायी चालून पांडुरंगाची अभंग गात वारी करत.
तसा पालखी सोहळ्याचा इतिहास संत तुकाराम महाराजांचे कनिष्ठ सुपुत्र नारायण महाराज यांनी इ.स.1685 मध्ये संतांच्या पादुका पालखीत ठेवून नेण्याची प्रथा सुरू केली. तेव्हापासून आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराज, देहूहून संत तुकाराम महाराज, त्र्यंबकेश्वरहून निवृत्तिनाथ महाराज, तापी मेव्हुणहून मुक्ताई महाराज, सासवड सोपानकाका महाराज यांच्या पादुका पालखीत नेण्याची परंपरा सुरू झाली. ती आजही मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी फुलून
गेली आहे.
पांडुरंगाच्या मूर्तीचे मूळ व इतिहास :
इतिहासकारांच्या मते पंढरपूरच्या पांडुरंगाची मूर्ती प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. पांडुरंगाचे मूळ नाव विठ्ठल. हे कानडी भाषेतील विठ म्हणजे वीट या शब्दावरून आले असावे. त्यामुळे विठ्ठल हे मूळचे कर्नाटकातील दैवत मानले जाते. जे नंतर महाराष्ट्रात लोकप्रिय झाले.विजयनगर साम्राज्याच्या काळात म्हणजे 15 व्या शतकात राजा कृष्णदेवरायाने विठ्ठलाची मूळ मूर्ती हंपी येथे नेली होती. जी नंतर संत भानुदास महाराज यांनी पुन्हा पंढरपुरात आणल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो.म्हणून जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर.तेव्हापासून संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून महाराष्ट्रातील सर्व संत मंडळी पंढरपूरला येत असत. तसेच पंढरपूरच्या नावाचा इतिहास वेगळाच आहे. पंढरपूरला ऐतिहासिक काळात विविध नावांनी ओळखले जायचे. इ.स. 516 मधील एका ताम्रपटात या क्षेत्राचा उल्लेख पांडुरंगपल्ली असा आढळतो. याव्यतिरिक्त पंडरंगे, पांडुरंगपूर, पंढरीपूरम आणि पंढरी हीदेखील प्राचीन नावे या तीर्थाविषयी पाहायला मिळतात. त्यामुळे अशा महान तीर्थक्षेत्राविषयी एकच म्हणावे लागेल-
संपत्ती सोहळा नावडे मनाला ।
लागला छंद हा पंढरीचा ।
जावे पंढरीसी आवडे मनासी ।
कधी एकादशी आषाढी ही ।
तुका म्हणे ऐसे आर्त ज्यांचे मनी ।
त्याची वाट पाहे चक्रपाणी ॥

When neither the animate nor the inanimate existed, Pandharpur already was.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

शतपावलीसाठी घराबाहेर पडलेल्या महिलेच्या गळ्यातील पोत हिसकावली

सिडको : प्रतिनिधी जेवण झाल्यानंतर घरासमोर शतपावली करण्यासाठी बाहेर पडलेल्या 72 वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची…

1 minute ago

मालेगावात प्रतिबंधित औषधांचा साठा जप्त

तिघांना अटक; 67 हजार अल्प्राझोलम गोळ्या, कोडीन सिरप मालेगाव : प्रतिनिधी मालेगाव पोलिसांनी अमली पदार्थ…

8 minutes ago

तरुणाचा आयफोनचा हट्ट; संभाजीनगरात संपले कुटुंब!

छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगरजवळील वाळूज-तीसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर एका अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक…

14 minutes ago

राज्यातील पोलीस ठाण्यांच्या रचनेत मोठे बदल

सध्याचे मनुष्यबळ 1960 च्या निकषांवर आधारित; गुन्ह्यांच्या संख्येनुसार पोलीस ठाण्याचा गट मुंबई : प्रतिनिधी राज्यातील…

24 minutes ago

‘पॅलेट गन’प्रकरणी गुन्हा दाखल

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आंदोलनाला यश नवी दिल्ली : प्रतिनिधी ‘नीट’ परीक्षेतील गैरव्यवहाराविरोधात आंदोलन…

36 minutes ago

सिंहस्थात स्वयंसेवी संस्थांचे योगदान

- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…

21 hours ago