आज या विषयावर आवर्जून लिहावंसं वाटतंय. एकीकडे चाललेल्या युद्धातून होणारी मानवहानी आणि दुसरीकडे त्यापासून येणारी अनेक नकारात्मक गोष्टींची सुरुवात. दैनंदिन आयुष्यात अनेक वेळा माणूस बोलून जातो की, मी असं करणार, मी तसं करणार. या गोष्टी मी पुढच्या वर्षी करणार. मी इतके पैसे आल्यावर ही वस्तू घेणार. मी तितके पैसे आल्यावर ती स्वप्न पूर्ण करणार. म्हणजे एकंदरीत आयुष्याचे नियोजनच लावून ठेवतो की. त्या नियोजनात इतका गुंतला जातो की, स्वतःला वेळच द्यायचा विसरून जातो. याचा अर्थ माझं म्हणणं असं नाहीये की, नियोजन केलं नाही पाहिजे, व्यवस्थापन केलं नाही पाहिजे. ते अतिशय गरजेचे जीवन जगताना. ते नक्कीच केलं पाहिजे, पण त्यात इतके गुंतून जाऊ नका की आपल्या आयुष्य कधीतरी अचानकपणे संपून जाईल आणि आपली स्वप्न तशीच अर्धवट राहून जातील.
तीन वर्षांपूर्वी आलेला कोविड खूप काही शिकवून गेलाय. अतिशय तरुण, बालक यात गमावली आहेत. कितीतरी परिवाराने काही साथ येणार, काही युद्ध होणार आणि त्यात कितीतरी स्वप्न रंगवलेले आयुष्य आपल्या स्वप्नांसोबतच कोमजून जाणार. सांगण्याचं तात्पर्य असं की दिवसेंदिवस स्पर्धात्मक आयुष्य आणि आवाजवी अपेक्षा यात माणूस पैशाच्या मागे आणि कामाच्या मागे एका धावू लागलाय की, तो स्वतःला वेळ द्यायला विसरलाय. त्याच्या छोट्या छोट्या इच्छा तो दाबून मारायला लागलाय आणि त्या नादात फक्त तो काम आणि काम यात गुंतून गेला. या स्पर्धात्मक जगात कधीकधी मानसिक ताणतणाव इतका वाढतो, कामाचे प्रेशर इतके वाढते, की हार्ट अटॅकचं प्रमाण दिवसेंदिवस वाढायला लागले. म्हणूनच तापाचं प्रमाण, मायग्रेनचे प्रमाण, अतिशय कमी वेळात विविध आजार, शुगर, बीपी ज्या वयात तुम्ही तरुण म्हणून असंख्य जबाबदार्या पेलण्यास समर्थ आहात असे आईबाबांना वाटते त्याच वेळा तुम्ही अशा अनेक आजारांनी झुंज देत आहात, यापेक्षा मोठे लक्षण अजून काही असू शकत नाही, की तुम्ही आयुष्याला किती मेहनतीने जगतायेत. मला असं म्हणायचं की, आयुष्य अगदी क्षणभंगुर आहे. या आयुष्याची अजिबात खात्री नाहीये, तरीसुद्धा आपण त्याच्यामागे धावत्या गाडीसारखे पळतच आहोत.
मला लेख लिहावासा वाटला कारण एक अतिशय जवळचे. उदाहरण मी बघितलं, माझ्या एका मैत्रिणीच्या नात्यातली एक मुलगी माहेरी गंगापूजनासाठी आली. तिथे फक्त एका डीजे साउंंडच्या जोरदार आवाजामुळे ती चक्कर येऊन पडली आणि तिला दवाखान्यात नेण्यापर्यंत तिने आपले प्राण गमावले आणि त्याचे निदान डॉक्टर आणि असे केले की, त्या डीजे साउंंडच्या आवाजाचा तिला त्रास होऊन तिच्या मेंदूची नस तुटली. हे कारण खूप खरंतर हळहळ करणार होतं आणि त्या परिवारासाठी अतिशय दुःखद आहे. आता त्या कार्यक्रमात कितीतरी तरुण, बालक, वयोवृद्ध उपस्थित होते, पण हेच पहिले तिच्यासोबत घडायचं अतिशय तरुण महिलेसोबत. विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की, तुम्ही खूप काही नियोजन केलेलं असतं. खूप गोष्टी ठरवल्या असतात, पण त्या जागच्या जागी राहू शकतात. इतकं आपलं आयुष्य क्षणभंगुर झाले आहे. आई-बाबांच्या मेहनतीचे, प्रामाणिकपणे आपण त्यांना फळ दिले पाहिजे. आयुष्यात मेहनत ही केलीच पाहिजे, पण त्या मेहनतीसोबत आणि ते यश मिळवताना आपलं आयुष्य जगलं पाहिजे. या छोट्या छोट्या गोष्टीत. आपल्याला आवड आहे त्या गोष्टी आपल्याला कराव्याशा वाटतात तर नक्की करावे आणि प्रत्येक दिवस हा असा जगून घ्यावा की, तुमच्या मनात कुठलीही खंत राहणार नाही की माझ्या या गोष्टी करायच्या राहूनच केल्यात. अगदी छोट्या छोट्या इच्छा असतात .साधं बागेत बसून एक निवांत पुस्तक वाचन, हेही त्यापैकी असू शकतं किंवा साधे एखादं छानसं गाणं ऐकत चहा पिणं हेसुद्धा असू शकतं.
नुसता लेख वाचायचा नाहीये तर या गोष्टी आपल्याला आवर्जून अंगी करायचा सुद्धा आहेत. आपल्या इच्छा कुठेही बाजूला न ठेवता त्या वेळेवरच पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करूया. अपेक्षांच्या मागे न धावता आजच्या दिवसाला सोन्यासारखा जगून घेऊया जेणेकरून आयुष्यात खंत नाही तर फक्त आनंद आणि आनंदच राहील. स्वप्नील जोशी यांचे एका मराठी चित्रपटातलं एक गाणं अतिशय सुंदर आहे. मला आवर्जून शेवटी सांगावसं वाटतंय त्या गाण्यातील या वाक्याचे बोल खूप काही शिकवून जातात.
जगुनी घे जरा उद्याचा
क्षणही आजचा,
विसरू कालच्या उद्याच्या चिंता
ही जरा ही तुझी जिंदगी
दो क्षणाची नशा…
This life is fleeting.