मालेगाव : प्रतिनिधी
मालेगाव-कुसुंबा रोडवरील टिंगरी येथील वनपट फाट्यावर बुधवारी सायंकाळी दुचाकी व पिकअपची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात दुचाकीवरील पती, पत्नी आणि मुलगी अशा एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. राजेंद्र नाना माने (45), बालाबाई राजेंद्र माने (35) आणि भटाबाई राजेंद्र माने (18, तिघे रा. चिंचगाव, जि. धुळे) अशी मृतांची नावे आहेत.
माने कुटुंबीय दुचाकीने मालेगावकडून धुळ्याच्या दिशेने जात होते. टिंगरी येथील वनपट फाट्यावर समोरून येणार्या पिकअपने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात तिघेही गंभीर जखमी झाले. अपघातानंतर त्यांना रुग्णवाहिकेने मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणी केल्यानंतर तिघांनाही मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी रुग्णालयात जाऊन मृतांच्या नातेवाइकांची भेट घेत सांत्वन केले. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने चिचगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी रात्री उशिरा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
Three members of the same family killed in collision between two-wheeler and pickup truck
नरेंद्र महाराज : ‘जेन झी’च्या ताकदीचे 42 उपक्रमांतून दर्शन घडवणार सिडको : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या…
चौकाचौकात भगव्या पताका, घरांवरही फडकले ध्वज नाशिक : प्रतिनिधी महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख…
आठ लाखांहून अधिक प्रवाशांची आतापर्यंत नोंदणी नाशिक : प्रतिनिधी दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली…
व्यावसायिकांची कोंडी; व्हीआयपींच्या स्वागताच्या मुद्यावरून नाराजीनाट्य त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या ध्वजारोहणाच्या त्र्यंबक…
जलआरक्षणात 1,350 एमसीएफटीची तूट नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि उपलब्ध पाणीसाठ्याच्या पार्श्वभूमीवर शहराच्या…
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाचे मनपाला पत्र नाशिक : प्रतिनिधी द्वारका ते नाशिकरोड येथील दत्त मंदिर…