सप्टेंबरमध्ये टेलिकॉम क्षेत्राच्या वाढीला आश्चर्यकारक वळण; सरकारी कंपनीचा ग्रोथ रेट सर्वाधिक
मुंबई : प्रतिनिधी
भारताच्या टेलिकॉम शर्यतीत एक अनपेक्षित ट्विस्ट आला आहे. सरकारी मालकीच्या बीएसएनएलने सप्टेंबर 2026 मध्ये खासगी दिग्गज जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया(व्हीआय)ला मासिक वाढीच्या दरात मागे टाकले आहे. दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय)ने 27 ऑक्टोबर रोजी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार हा खुलासा झाला आहे.
ट्रायच्या डेटानुसार, बीएसएनएलचा मासिक ग्राहक वाढीचा दर 0.67% राहिला, जो सर्वांत जास्त आहे. त्यापाठोपाठ एअरटेलचा 0.55%, जिओचा 0.53% आणि व्हीआयचा 0.28% वाढीचा दर राहिला. बीएसएनएलने सप्टेंबरमध्ये निव्वळ 6.26 लाख नवीन ग्राहक जोडले, त्यामुळे त्यांचा एकूण ग्राहक आकडा 9.42 कोटींवर पोहोचला आहे. यातील 37.4% ग्राहक ग्रामीण भागातील आहेत. सध्या बाजारहिस्सा – जिओ 39.32% (51.11 कोटी), एअरटेल 38.02% (49.43 कोटी), व्हीआय 15.39% आणि बीएसएनएल 7.25% असा आहे. म्हणजे बीएसएनएल टक्केवारीत जिंकत असली तरी, जिओ-एअरटेलच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी अजून मोठा पल्ला गाठायचा आहे.
खरी बाजी कोणाची?
टक्केवारीत बीएसएनएल अव्वल असली तरी, प्रत्यक्ष ग्राहक जोडण्याच्या आकड्यात अजूनही जिओ आणि एअरटेलचेच वर्चस्व आहे. जिओने सर्वाधिक 27.13 लाख तर एअरटेलने 26.92 लाख ग्राहक जोडले आहेत. बीएसएनएलचा बेस छोटा असल्यामुळे कमी ग्राहक जोडूनही टक्केवारीतील वाढ जास्त दिसते.
BSNL surges ahead, leaving Jio and Airtel behind!
तीन हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात सिडको : प्रतिनिधी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पुरोहित संघाच्या…
पहाटेच्या वेळी कानावर पडणारा पक्ष्यांचा गोड, मधुर अन् मंजूळ किलबिलाट कोणाला बरं आवडत नाही? सूर्य…
महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार आणि कर्नाटक या मोठ्या राज्यांतील विधान परिषदांच्या पदवीधर व शिक्षकांच्या 28…
नरेंद्र महाराज : ‘जेन झी’च्या ताकदीचे 42 उपक्रमांतून दर्शन घडवणार सिडको : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या…
चौकाचौकात भगव्या पताका, घरांवरही फडकले ध्वज नाशिक : प्रतिनिधी महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख…
आठ लाखांहून अधिक प्रवाशांची आतापर्यंत नोंदणी नाशिक : प्रतिनिधी दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली…