उन्हाचा ताप, वाहतुकीच्या कोंडीमुळे मनस्ताप
नाशिक : प्रतिनिधी
शहरात सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे सुरू असलेल्या खोदकामामुळे वाहतुकीची पुरती वाट लागली असून, चौकाचौकांत सुरू असलेल्या खोदकामामुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे. या कोंडीतून मार्ग काढताना वाहनधारक मेटाकुटीला आले आहेत. शहर वाहतूक पोलिसांनी ट्रॅफिक वॉर्डन नियुक्त केलेले असले तरी त्यांच्याकडूनही वाहतूक कोंडी फोडण्याचे काम प्रभावी होत नाही. त्यामुळे कार्यलयात पोहोचताना चाकरमान्यांची मोठी धावपळ होत आहे. वाहतूक कोंडीतून एकमेकांच्या वाहनाने खरचटण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे किमान चौकातील वाहतूक कोंडी दूर होण्यासाठी शहर पोलिसांनी व महापालिकेने नियोजन करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात सध्या भुयारी गटार योजना, जलवाहिनी आणि विद्युत विभागाची तसेच केबल व गॅस पाइपलाइन अशी सर्वच कामे सुरू आहेत. त्यात ही कामे डक्ट पद्धतीने केली जात आहेत. त्यामुळे निम्मा रस्ता खोदला जात आहे. चौकात खोदकाम केल्यामुळे मोठमोठ्या नाल्या तयार झाल्या आहेत. त्या व्यवस्थित बुजविल्या न गेल्यामुळे वाहनधारकांना या नाल्यातून वाहने आपटल्याशिवाय मार्गक्रमण करता येत नाही. गंगापूर रोडवरील केबीटी सर्कल, हुतात्मा सर्कल, प्रसाद सर्कल, केटीएचएम कॉलेजजवळचा परिसर ही वाहतूक कोंडीची केंद्रस्थाने बनली आहेत.
सुरक्षा उपायांचा अभाव
खोदकाम करताना बॅरिकेडिंग केले जात नाही. त्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून वाहने चालविण्याची वेळ आली आहे. वाळूने भरलेल्या गोण्या रस्त्याच्या कडेला ठेवून दिल्या जातात. त्यामुळे वाहन नाल्यात पडण्याचा धोका आहे.
दुहेरी रस्ता असला तरी एकाच लेनमधून दोन्ही बाजूची वाहने एकाच वेळी जाणे अवघड होते. त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीत चांगलीच भर पडत आहे. आधीच उन्हाचा ताप वाढलेला असताना त्यात वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. महापालिकेच्या पदाधिकार्यांनी चार दिवसांपूर्वी दौरे करून संबधितांना ताकीद दिली आहे. मात्र, तरीही काहीच फरक पडलेला नसल्याचे चित्र पाहावयास मिळते.
खोदकामानंतर अनेक मोठमोठे दगड तसेच मातीचे ढिगारे तसेच सोडून दिले जात आहेत. शिवाजीनगर येथे तर खोदकामानंतर मोठे ढिगारे जैसे थे आहेत. त्यामुळे वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे.
या ठिकाणी होते कोंडी
मॅरेथॉन चौक, जेहान सर्कल, मुंबई नाका, सारडा सर्कल, नागजी सिग्नल, अशोकनगर भाजी बाजार, भुजबळ फार्म परिसर, बारदान फाटा या ठिकाणी वाहतुकीचे नियमन करणे गरजेचे आहे. येथे सातत्याने कोंडी होते.
नियोजनाचा अभाव
खोदकाम करताना नियोजनाचा अभाव दिसून येत आहे. अनेक रस्ते ऐनवेळी बंद केले जातात. दोन-तीन किलोमीटर गेल्यानंतर वाहनधारकाला संबंधित रस्ता बंद आहे, हे समजते. त्यामुळे पुन्हा रिटर्न फिरावे लागते.
Traffic jams choked the breath of the squares
‘वर्षामागूनी वर्ष सरती ऋतू मागूनी ऋतू’ या गाण्याच्या ओळीप्रमाणे ऋतू चक्र फिरत असते. महिने, वर्ष…
अनेकांना वाटतं की, पेट्रोल-डिझेल महागलं की फक्त स्वतःची गाडी असणार्यांनाच फटका बसतो. पण हे अर्थशास्त्र…
बालपण म्हणजे जणू सुंदर स्वप्न. जे जगताना कधी कळत नाही, पण नंतर आठवलं की डोळे…
पोलिसांचा कानाडोळा; वाहतूक कोंडीत भर नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशी मोहीम शहर…
109 गावे, 238 वाड्यांना टँकरद्वारे पाणी नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची समस्या अधिक…
1.46 लाख शेतकरी बाधित, 145.87 कोटींची मदत मंजूर नाशिक : प्रतिनिधी मार्च 2026 मध्ये झालेल्या…