मंत्री महाजन यांची तत्काळ धाव; प्रसंगावधान राखत ट्रकचालकाला मदत
नाशिक : प्रतिनिधी
भिवंडी-कल्याण बायपासजवळ रविवारी (दि. 23) दुपारी एक वाजेच्या सुमारास वाहतूक करणार्या ट्रकने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. सुदैवाने ट्रकचालकाने प्रसंगावधान राखत वाहन रस्त्याच्या कडेला थांबविल्याने मोठा अनर्थ टळला. याचवेळी या मार्गावरून प्रवास करत असलेले राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या निदर्शनास ही घटना आली.
या घटनेचे गांभीर्य लक्षात येताच मंत्री महाजन यांनी क्षणाचाही विलंब न करता आपले वाहन थांबवून स्वतः घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी ट्रकचालकाची विचारपूस करून त्याला सुरक्षित अंतर राखण्यासह आग विझविण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी संबंधित यंत्रणेशी तातडीने संपर्क साधून मदतीसाठी आवश्यक निर्देश दिले.
दरम्यान, ट्रकला आग लागल्याने या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन मंत्री महाजन यांनी वाहतूक पोलिसांनाही तातडीने वाहतूक सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या. त्यांच्या तत्पर हस्तक्षेपामुळे परिस्थिती वेळीच नियंत्रणात आणण्यात आली. संकटाच्या प्रसंगी घटनास्थळी पोहोचून नागरिकांना मदतीचा हात देण्याची मंत्री महाजन यांची कार्यपद्धती पुन्हा एकदा अधोरेखित झाली. प्रशासनातील अधिकारी म्हणून नव्हे, तर एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणूनही संकटसमयी नागरिकांच्या मदतीला धावून जाणे, हा त्यांच्या ‘संकटमोचक’ या ओळखीचा प्रत्यय देणारा प्रसंग ठरला. ट्रकचालकाने वेळीच प्रसंगावधान राखले आणि मंत्री महाजन यांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टळली.
Truck catches fire on Bhiwandi-Kalyan bypass
- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…
- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…
महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…
बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…
वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…