नाशिक

धारदार कोयत्यासह तरुणाला अटक

तडीपार आदेशाचे उल्लंघन

सिडको : प्रतिनिधी
तडीपार आदेश लागू असतानाही नाशिक शहर व ग्रामीण जिल्ह्यात प्रवेश करून धारदार कोयता बाळगणार्‍या तरुणाला सातपूर पोलिसांनी अटक केली. अमोल संजय मांजरे (वय 24, रा. आम्रपाली चौक, प्रबुद्धनगर, सातपूर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री अडीचच्या सुमारास प्रबुद्धनगर, अशोकनगर परिसरातील नंदिनी हॉटेलच्या बाजूला मांजरे हा संशयास्पदरीत्या आढळला. त्याच्याकडे सुमारे 19 इंच लांबीचा लोखंडी कोयता आढळला. या कोयत्याला सुमारे 14 इंच लांबीचे धारदार पाते आणि पाच इंचाची मूठ असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मांजरे याच्याविरुद्ध सातपूर आणि अंबड पोलिस ठाण्यात यापूर्वी चोरीसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध पोलिस उपायुक्त, परिमंडळ-2, नाशिक शहर यांनी 3 डिसेंबर 2025 रोजी तडीपार आदेश काढला होता. त्यानुसार 13 डिसेंबर 2025 ते 12 डिसेंबर 2027 या कालावधीत त्याला नाशिक शहर व नाशिक ग्रामीण जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.
तडीपार आदेश लागू असतानाही नाशिकमध्ये प्रवेश केल्याने, तसेच पोलिस आयुक्तांनी जारी केलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन करून धारदार शस्त्र बाळगल्याने त्याच्याविरुद्ध सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Youth arrested with a sharp sickle.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

बापमाणूस

- ज्योती काळे-जाधव जगाने आईच्या मातृत्वाइतकाच पित्याच्या बिनशर्त त्यागाला महत्त्व दिले आहे का? बाप म्हणजे…

18 hours ago

का आकर्षिते ही जिंदगी?

- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…

18 hours ago

श्रावणी शुक्रवार

- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…

18 hours ago

अभ्यासाची आवड आणि करिअरची दिशा

महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…

18 hours ago

जेन-झी मानसिकता

बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्‍या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…

19 hours ago

मान्यता नाही, तरीही वर्ग सुरूच!

वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…

19 hours ago