निफाड : तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील खडक माळेगाव येथे रविवारी (दि. 11) घटस्थापनेच्या दिवशी सायंकाळच्या सुमारास ट्रॅक्टर आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. मृतांमध्ये गाजरवाडी येथील नऊमोर्या शिवारात राहणार्या मंदाबाई श्रीहरी पगारे आणि दिंडोरी तालुक्यातील तास येथील केदू विठ्ठल जाधव यांचा समावेश आहे. यात जखमी असलेल्या तिसर्या महिला सरला केदू पगारे यांच्यावर निफाड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कांदा लागवडीसाठी आणलेल्या महिलांना घेऊन जाणार्या ट्रॅक्टरला सायंकाळ च्या सुमारास खडकमाळेगाव शिवारात मोटारसायकलने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने या मोटारसायकलवर तीन जण प्रवास करत होते. त्यापैकी मोटरसायकल चालक केदु विठ्ठल जाधव वय 70,राहणार दिंडोरी तास तर मंदाबाई श्रीहरी पगारे राहणार गाजरवाडी नऊ मोर्या शिवार हे दोघे मृत झाले केदू जाधव यांच्या पत्नी सरला केदु जाधव वय 65 राहणार दिंडोरी तास या. गंभीर जखमी झाल्या असून त्यांना अधिक उपचारासाठी निफाड येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे,
अपघाताची माहिती समजताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. या अपघातामुळे खडक माळेगाव परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली तर.या अपघातात मृत झालेले केदु जाधव हे दिंडोरी तास येथील तर मंदाबाई पगारे या गाजरवाडी येथील रहिवाशी आहेत, परिणामी या अपघाताचे वृत्त समजताच गाजरवाडी आणि दिंडोरी तास मध्ये शोककळा पसरली आहे. लासलगाव चे पोलिस रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी या अपघाताचा गुन्हा नोंद करण्याचे काम करीत होते असे समजते.
Two killed in Khadak Malegaon accident.
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः। यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः॥ भावार्थ : जिथे स्त्रीचा…
- मनीषा चौधरी चित्रपटसृष्टीत सध्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे तो म्हणजे, नितेश तिवारी दिग्दर्शित आणि…
- डॉ. किशोर पवार मानवी शरीरासाठी जीवनसत्त्वाचे महत्त्व किती अनन्यसाधारण आहे याची कल्पना सर्वांनाच आहे.…
- ज्योती काळे-जाधव अलीकडच्या काळात घडणार्या आत्महत्यांच्या घटना मनाला अस्वस्थ करून जातात. पुण्याची पायल, काल…
- प्रणाली देशमुख तसा खूप मोठा परिवार आहे यांचा! पिढ्यान्पिढ्या आपल्याला अगदी मनपसंद, चमचमीत, तिखट-गोड…
- वाहिद बागवान रस्ता कुठे जातो, हे सांगण्यासाठी उभारलेल्या दिशादर्शक कमानींवर आता कोणत्या नेत्याचा वाढदिवस…