नाशिक

विंचूर परिसरात जनावरांमध्ये अज्ञात आजाराचा कहर

दुभत्या गायी दगावल्या, दुग्धव्यवसाय संकटात

विंचूर : प्रतिनिधी
येथील सालकाडे वस्तीवरील पशुपालकांची सात ते आठ दुभती जनावरे अज्ञात आजाराने दगावल्याने पशुपालक व शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या रोगामुळे जनावरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून, दुग्धव्यवसाय धोक्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या दहा-बारा दिवसांपासून येथील सालकाडे वस्ती व परिसरातील सुमारे पन्नासपेक्षा अधिक जनावरांना अज्ञात आजाराची लागण झालेली आहे. या अज्ञात आजाराने बंडू सालकाडे यांच्या सहा गायी टप्प्याटप्प्याने दगावल्या. पुंजाराम सालकाडे यांची म्हैसही दगावली. दुभती जनावरे दगावल्याने दुग्धव्यवसाय संकटात सापडला असून, शेतकर्‍यांना मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे.जनावरांना वाचविण्यासाठी येथील खासगी पशुवैद्यकांनी शर्थीचे प्रयत्न केले. पण आजाराचे निदान न झाल्याने जनावरे मृत्युमुखी पडली. प्रभावग्रस्त गोठ्यांना पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. राहुल कोठाळे यांच्यासमवेत पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कपिल तोरण पवार व डॉ. पूजा देशमुख, पशु पर्यवेक्षक योगेश शिंदे आदींनी भेट देऊन मृत जनावरांचे विच्छेदन केले. रोग निदानाकरिता मृत जनावरांचे नमुने रोग अन्वेषण प्रयोगशाळा, पुणे येथे पाठविण्यात आले आहेत.

लसीकरणासाठी सहकार्य करावे

अज्ञात आजाराचा धोका लक्षात घेता पशुचिकित्सालय, विंचूरच्या वतीने बाधित जनावरांना औषधोपचार व लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. पशुपालकांनीदेखील जनावरांची काळजी घ्यावी. गोठ्यांमध्ये स्वच्छता ठेवावी. थंडीपासून जनावरांचे संरक्षण करावे. जनावरांना पोषक आहार व व्हिटॅमिन सप्लिमेंट द्यावे. गोठ्यात बाधित जनावर आढळल्यास तत्काळ पशुवैद्यकीय चिकित्सालय, विंचूरशी संपर्क साधावा. सदरील जनावरांना त्वरित औषधोपचार सुरू करावा. लसीकरणासाठी सहकार्य करावे, असे आवाहन विंचूर पशुवैद्यकीय चिकित्सालयातर्फे करण्यात आले आहे.

Unknown disease wreaks havoc among animals in Vinchur area

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

15 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

15 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

16 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

16 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

16 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

16 hours ago