उत्तर महाराष्ट्र

विजय करंजकर अखेर शिंदे गटात, मिळाली ही जबाबदारी

नाशिक: प्रतिनिधी

नाशिक लोकसभा मतदार संघात उमेदवारी न मिळाल्याने ठाकरे गटाचे लोकसभा संघटक  विजय करंजकर यांनी अखेर ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश केला, करंजकर यांनी आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये शिंदे गटात प्रवेश केला.  करंजकर हे नाशिक लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. त्यांनी प्रचार पण सुरू केला होता, परंतु ऐनवेळी ठाकरे गटाने सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर केली होती, यामुळे करंजकर यांनी लढणार आणि नडणार असे म्हणत उमेदवार म्हणून अर्ज भरला होता, यादरम्यान मातोश्री वर त्यांना बोलावण्यात देखील आले होते. परंतु त्यांची भेट ठाकरेशी झालीच नाही, शिंदे गटाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, दादाजी भुसे यांनी करंजकर यांना शिंदे गटात आणत त्यांचा प्रवेश घडवूनआणला, त्यांना उपनेते पद तसेच नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख हे पद दिले आहेत, त्यांनी उमेदवारी मागे घेतल्याने आता गोडसे यांना दिलासा मिळणार आहे.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

14 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

14 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

15 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

15 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

15 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

15 hours ago