दि. 24 ते 30 मे 2026
पुरुषोत्तम नाईक
मेष : समिकरणे जुळतील
या सप्ताहात रवी, बुध, मंगळ, राहू, केतू अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. शनिची साडेसाती सुरू आहे. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. धनचिंता सतावतील. खर्च वाढतील. नोकरदारांना अडचणी जाणवतील. व्यापारी, व्यावसायिकांची समिकरणे जुळतील. मनावर संयम ठेवण्याची आवश्यकता आहे. आरोग्यप्रश्नांची काळजी घ्या.
वृषभ : यशप्राप्ती होईल
या सप्ताहात बुध, गुरू, शुक्र, शनि अनुकूल आहेत. रवी, मंगळ, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांना अडचणींना तोंड द्यावे लागेल. व्यापारी, व्यावसायिकांच्या नवीन योजनांना गती मिळेल. या सप्ताहात प्रवास टाळा, वाहन जपून चालवा. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामात यशप्राप्ती होईल. आरोग्य चांगले राहील.
मिथुन : पैशांची आवक वाढेल
या सप्ताहात मंगळ, शुक्र, शनि, राहू, केतू अनुकूल आहेत. बुध दि. 29 ला अनुकूल होत आहे. गुरू संमिश्र आहे. रवी प्रतिकुल आहे. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. पैशांची आवक वाढेल. खर्चही वाढतील. नोकरदारांवर कामाचा ताण पडेल. व्यापारी, व्यावसायिकांनी महत्त्वाचे निर्णय लांबणीवर टाकावेत. मानसिक अस्वास्थ्य सतावेल. आरोग्याची काळजी घ्या.
कर्क : धनचिंतांना उतार
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, शनि अनुकूल आहेत. गुरू, शुक्र, राहू, केतू प्रतिकुल आहेत. बुध दि. 29 मे पासून प्रतिकुल आहे. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. धनचिंतांना उतार पडेल. नोकरदारांनी वरिष्ठांशी वादविवाद, संघर्ष टाळावेत. व्यापारी, व्यावसायिकांनी सावध भूमिका ठेवणे आवश्यक राहील. प्रकृतीची काळजी घ्या.
सिंह : कामे मार्गी लागतील
या सप्ताहात मंगळ, बुध, गुरू, शुक्र अनुकूल आहेत. रवी, शनि, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. येणे पैसे वसूल होतील. खर्च नियंत्रणात राहतील. नोकरदारांनी कामावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक राहील. व्यापारी, व्यावसायिकांचे सांपत्तिक प्रश्न सुटतील. कोर्ट, कचेरी शासकीय कामात अडकलेली कामे मार्गी लागतील. आरोग्याची काळजी घ्या.
कन्या : प्रवास टाळा
या सप्ताहात रवी, बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. मंगळ, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. नोकरदारांची द्विधा मनस्थिती होईल. व्यापारी, व्यावसायिकांनी कुणावर विसंबून कामे करू नयेत. शेअरमध्ये सावधपणे पैसे गुंतवावे. प्रवास टाळावा. वाहन जपून चालवावे. प्रकृतीची काळजी घ्यावी.
तूळ : संयम ठेवा
या सप्ताहात मंगळ, गुरू, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. रवी, बुध, ानि प्रतिकुल आहेत. दि. 29 मे रोजी बुध अनुकूल होईल. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. मनावर संयम ठेवा. कौटुंबिक वादविवाद सामंजस्याने सोडवा. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांनी महत्त्वाचे निर्णय लांबणीवर टाकावे. विरोधकांच्या कारवायांवर लक्ष ठेवा. आरोग्याची काळजी घ्या.
वृश्चिक : धनचिंता त्रस्त करतील
या सप्ताहात बुध, शनि अनुकूल आहे. रवी, मंगळ, गुरू, शुक्र, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्र्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक अडचणी सतावतील. धनचिंता त्रस्त करतील. नोकरदारांच्या कामातील चुकांमुळे अडचणी जाणवतील. व्यापारी, व्यावसायिकांनी महत्त्वाची कामे दि. 28 मे पर्यंत करावीत. आरोग्य सांभाळा.
धनु : आर्थिक भरभराट
या सप्ताहात मंगळ, बुध, गुरू, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांची आर्थिक भरभराट होईल. खर्च आटोक्यात राहतील. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामात यश मिळेल. शेअरमध्ये लाभ संभवतात. आरोग्य चांगले राहील.
मकर : सन्मानप्राप्ती
या सप्ताहात शनि, रवी, बुध, शुक्र अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. मंगळ, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. नोकरदारांना वादविवादांना तोंड द्यावे लागेल. विरोधकांच्या कारवायांवर लक्ष ठेवा. व्यापारी, व्यावसायिकांना सन्मानप्राप्तीचे योग येतील. प्रकृती जपा.
कुंभ : जोरदार आगेकूच
या सप्ताहात मंगळ, बुध, गुरू, शुक्र अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, रवी, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. धनचिंता सतावतील. मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. नोकरदारांची व व्यापारी, व्यावसायिकांची जोरदार आगेकूच होईल. आरोग्य चांगले राहील. शासकीय कामात यश, शेअरमध्ये लाभ होतील.
मीन : कामे मार्गी लागतील
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, शुक्र अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, गुरू, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे प्रतिकुल आहेत. या सप्ताहात आर्थिक अडचणी सतावतील. नोकरदार व व्यापारी, व्यावायिकांची कामे मार्गी लागतील. मानसिक क्लेश संभवतात. विरोधक त्रस्त करतील. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामात अडचणी येतील. आरोग्याची काळजी घ्या.
Weekly Horoscope
मुंबई: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या जागेवर मंत्री छगन भुजबळ यांना संधी दिली जाईल,…
बाजारात गावरान कैर्यांची धूम, महागाईमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले दिंडोरी : प्रतिनिधी पहिल्या मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनाने…
कुंभमेळ्याच्या नावाखाली सुरक्षेचे नियम धाब्यावर; यंत्रणांचे सोयीस्कर दुर्लक्ष त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळा तोंडावर असल्याने…
ज्याची ’सांस्कृतिक राजधानी’ आणि ’विद्येचे माहेरघर’ असे संबोधल्या जाणार्या पुणे शहराचा गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढतच…
सहा जून ही तारीख भारतीय इतिहासाला कलाटणी देऊन सुवर्णाक्षरात कोरली गेलेली आहे. तीन शतकांच्या पारतंत्र्यानंतर…
इबोला नावाच्या विषाणूने आफ्रिकन देशांना विशेषतः काँगोला ग्रासले आहे. हा विषाणू नवनव्या रूपात प्रकट होत…