दि. 23 ते 29 ऑगस्ट 2026
पुरुषोत्तम नाईक
मेष : सुखवार्ता कळतील
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, राहू, केतू अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, गुरू, शुक्र प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. पैशांची आवक वाढेल. खर्च वाढेल. नोकरदारांना अडचणींना तोंड द्यावे लागेल. व्यापारी, व्यावसायिकांना सुखवार्ता कळतील. धाडस यशस्वी होईल. आरोग्य चांगले राहील.
वृषभ : धावपळ होईल
या सप्ताहात मंगळ, बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. रवी, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च नियंत्रित राहतील. शासकीय, कोर्ट, कचेरीची कामे लांबणीवर पडतील. नोकरदारांची धावपळ होईल. व्यापारी, व्यावसायिकांनी कुणावर अवलंबून निर्णय घेऊ नये. आरोग्याची काळजी घ्या.
मिथुन : जोरदार आगेकूच
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू, केतू अनुकूल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक अडचणी सौम्य होतील. खर्च आटोक्यात राहतील. मनावर संयम ठेवा. वादविवाद टाळा. नोकरदारांना अडचणीतून मार्ग सापडतील. व्यापारी, व्यावसायिकांची जोरदार आगेकूच होईल. नवीन वाहन खरेदी शक्य. प्रकृती चांगली राहील.
कर्क : पैसे मिळतील
या सप्ताहात रवी, बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. मंगळ, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे प्रतिकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागेल. खर्च वाढतील. या सप्ताहात प्रवास टाळा. वाहन जपून चालवा. नोकरदारांचे कार्यालय, घरी वादविवाद होतील. व्यापारी, व्यावसायिकांचे अडकलेले पैसे मिळतील. आरोग्याबाबत काळजी घ्या. कुपथ्य टाळा.
सिंह : पगारवाढ मिळेल
या सप्ताहात मंगळ, बुध, शुक्र अनुकूल आहेत. रवी, गुरू, शनि, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांना पगारवाढ मिळेल. व्यापारी, व्यावसायिकांनी अकारण धाडस टाळावे. कौटुंबिक वाद सामंजस्याने सोडवावे. प्रकृतीकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.
कन्या : करारमदार टाळा
या सप्ताहात मंगळ, गुरू, शुक्र, शनि अनुकूल आहेत. रवी, बुध, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांचे वरिष्ठांशी संघर्ष होतील. व्यापारी, व्यावसायिकांनी करारमदार करणे, कुठल्याही कागदपत्रावर सही करणे टाळावे. प्रकृतीकडे लक्ष द्यावे.
तूळ : चैनीच्या वस्तूंची खरेदी
या सप्ताहात मंगळ, बुध, राहू, केतू अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. रवी, शुक्र, शनि प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. पैशांच्या वाटा मोकळ्या होतील. खर्च वाढतील. चैनीच्या वस्तूंची खरेदी होईल. नोकरदारांची व व्यापारी, व्यावसायिकांची मनस्थिती द्विधा होईल. आरोग्याची काळजी घ्या. कुपथ्य टाळा.
वृश्चिक : भाग्योदय होईल
या सप्ताहात बुध, गुरू, शुक्र, शनि अनुकूल आहेत. रवी, मंगळ, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक समृद्धी प्राप्त होईल. खर्च नियंत्रणात राहतील. भाग्योदयकारक घटना घडतील. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांनी कुणावर विसंबू नये. प्रवास टाळावा. वाहन जपून चालवावे. प्रकृतीची काळजी घ्यावी.
धनु : इच्छा पूर्ण होतील
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. गुरू, शनि प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. धनचिंता दूर होतील. खर्च आटोक्यात राहतील. नोकरदारांच्या इच्छा पूर्ण होतील. व्यापारी, व्यावसायिकांची कामे पूर्ण होतील. आरोग्याची काळजी घ्या.
मकर : बढती मिळेल
या सप्ताहात गुरू, शुक्र, शनि अनुकूल आहेत. रवी, मंगळ, बुध, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च आटोक्यात राहतील. नोकरदारांना बढती मिळेल. व्यापारी, व्यावसायिकांचे आडाखे चुकतील. आरोग्यप्रश्नांची काळजी घ्या. कुपथ्य टाळा.
कुंभ : मंगलवार्ता कळतील
या सप्ताहात मंगळ, बुध अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, गुरू संमिश्र आहे. रवी, शुक्र, राहू, केतू प्रतिकूल आहेत. या सप्ताहात चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांना मंगलवार्ता कळतील. व्यापारी, व्यावसायिकांची समीकरणे जुळतील. मोह टाळा. प्रकृती जपा.
मीन : आनंदवार्ता कळतील
या सप्ताहात बुध, गुरू, शुक्र अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, रवी, मंगळ, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांना आनंदवार्ता कळतील. व्यापारी, व्यावसायिकांच्या अडचणी दूर होतील. नवीन ओळखी होतील. मित्र-मैत्रिणी भेटतील. आरोग्य चांगले राहील.
Weekly Horoscope
- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…
- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…
महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…
बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…
वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…