दि. 6 ते 12 सप्टेंबर 2026
पुरुषोत्तम नाईक
मेष : कामे पूर्ण होतील
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, गुरू प्रतिकूल आहे. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. पैशांची आवक वाढेल. नोकरदारांची वाटचाल अडचणीतून होईल. व्यापारी, व्यावसायिकांची कामे पूर्ण होतील. शासकीय, कोर्ट-कचेरीच्या कामात अडचणी येतील. प्रकृती चांगली राहील.
वृषभ : अचानक धनलाभ
या सप्ताहात मंगळ, बुध, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. रवी, राहू, केतू, शुक्र प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. खर्च आटोक्यात राहतील. या सप्ताहात अचानक धनलाभाचा योग संभवतो. नोकरदारांना अडचणी त्रस्त करतील. व्यापारी, व्यावसायिकांची जोरदार आगेकूच होईल. आरोग्याची काळजी घ्या. कुपथ्य टाळा.
मिथुन : पैशांची आवक वाढेल
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू, केतू अनुकूल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. खर्च आटोक्यात राहतील. अडकलेले पैसे वसूल होतील. पैशांची आवक वाढेल. नोकरदारांना अडचणीतून वाटचाल करावी लागेल. व्यापारी, व्यावसायिकांच्या योजना यशस्वी होतील. आरोग्याबाबत दक्ष राहो आवश्यक ठरेल.
कर्क : जोरदार आगेकूच
या सप्ताहात रवी, बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. मंगळ, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. प्रवास टाळा, वाहन जपून चचालवा. नोकरदारांनी वरिष्ठांशी वादविवाद टाळावेत. व्यापारी, व्यावसायिकांची जोरदार आगेकूच होईल. आरोग्याचची काळजी घ्या. कुपथ्य टाळा.
सिंह : कौतुक होईल
या सप्ताहात मंगळ, बुध, शुक्र अनुकूल आहेत. रवी, गुरू, शनि, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांच्या कामाचे कौतुक होईल. व्यापारी, व्यावसायिकांचे पैसे वसूल होतील. शेअरमध्ये लाभ होतील. प्रकृती जपा.
कन्या : दिलासा मिळेल
या सप्ताहात मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि अनुकूल आहेत. रवी, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च मोठ्या प्रमाणात वाढतील. नोकरदारांनी संयम पाळणे हिताचे ठरेल. मानसिक अस्वास्थ्य राहील. विरोधकांच्या कारवायांवर लक्ष ठेवा. व्यापारी, व्यावसायिकांचे आडाखे अचूक ठरतील. प्रेमीजनांना दिलासा मिळेल.
तूळ : लाभ होतील
या सप्ताहात रवी, मंगळ, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. बुध, शनि प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. पैशांचे स्त्रोत वाढतील. नोकरदारांना जादा कामाचा ताण पडेल. व्यापारी, व्यावसायिकांचे निर्णय चुकतील. खर्चाचे प्रमाण वाढेल. शासकीय, कोर्ट- कचेरीच्या कामांना विलंब होईल. आरोग्य चांगले राहील. शेअरमध्ये लाभ होतील.
वृश्चिक : यशप्राप्ती होईल
या सप्ताहात बुध, गुरू, शनि अनुकूल आहेत. रवी, मंगळ, राहू, केतू शुक्र प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांना अडचणी सतावतील. व्यापारी, व्यावसायिकांचे अडकलेले पैसे वसूल होतील. शासकीय, कोर्ट-कचेरीच्या कामात यशप्राप्ती होईल. प्रवास टाळा, वाहन जपून चालवा. आरोग्याची काळजी घ्या.
धनु : काळजी घ्या
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. शनि प्रतिकूल आहे. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च आटोक्यात राहतील. नोकरदारांना दिलासा मिळेल. व्यापारी, व्यावसायिकांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. शासकीय, कोर्ट-कचेरीच्या कामात विलंब होईल. प्रकृतीची काळजी घ्या.
मकर : भाग्योदय होईल
या सप्ताहात बुध, गुरू, शुक्र, शनि अनुकूल आहेत. रवी, मंगळ, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे प्रतिकूल आहेत. या सप्ताहात धनचिंता सतावतील. खर्च आटोक्यात राहतील. नोकरदारांच्या समस्या दूर होतील. व्यापारी, व्यावसायिकांचा भाग्योदय होईल. शासकीय, कोर्ट-कचेरीच्या कामात यश मिळेल. प्रकृतीची काळजी घ्या.
कुंभ : सुखवार्ता कळतील
या सप्ताहात मंगळ, बुध, शुक्र अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, गुरू संमिश्र आहे. रवी, बुध, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांना सुखवार्ता कळतील. व्यापारी, व्यावसायिकांची समीकरणे जुळणार नाहीत. शेअरमध्ये सावधपणे गुंतवणूक करा. आरोग्याची काळजी घ्या. तोंडावर ताबा ठेवा.
मीन : इच्छा पूर्ण होतील
या सप्ताहात बुध, गुरू अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, रवी, मंगळ, शुक्र, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. शासकीय, कोर्ट-कचेरीची कामे मनासारखी होतील. विरोधकांच्या कारवायांवर लक्ष ठेवा. नोकरदारांना बढती मिळेल. व्यापारी, व्यावसायिकांच्या इच्छा पूर्ण होतील. आरोग्य जपा.
Weekly Horoscope
पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…
तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…
ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…
अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…
महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…
विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…