महाराष्ट्र

एमपीएससी विद्यार्थ्यांचा मोर्चा

आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा देण्याची मागणी

पुणे/कोल्हापूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) परीक्षेची तयारी करणार्‍या हजारो विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या औषध निरीक्षक (ड्रग इन्स्पेक्टर) परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि इतर अनियमिततेविरोधात सोमवारी, पुणे आणि कोल्हापुरात आक्रोश मोर्चा काढला. पुण्यात हा मोर्चा ओंकारेश्वर मंदिराजवळून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला. या मोर्चात विद्यार्थी आणि नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत एमपीएससीच्या कारभारावर तीव्र असंतोष व्यक्त केला. आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची आणि संपूर्ण परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याची मागणी आंदोलकांनी प्रामुख्याने केली आहे.

या आंदोलनातून एमपीएससी प्रशासनातील गोंधळ आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी होणारा खेळ यावर प्रकाश टाकण्यात आला. परीक्षांमधील पेपरफुटी, निकाल लावण्यास होणारा विलंब आणि अभ्यासक्रमातील वारंवार होणारे बदल याबद्दल विद्यार्थ्यांनी उद्वेग व्यक्त केला. या सर्व प्रक्रियेतील अनियमितता दूर करण्यासाठी कठोर उपाययोजना राबविण्याची आणि दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनी या मोर्चात प्रत्यक्ष सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला. याशिवाय, शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस आणि इतर सामाजिक संघटनांनीही या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला आहे. मोर्चात सहभागी झाल्यानंतर सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनी राज्य सरकारवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. मुले शिक्षण सोडून रस्त्यावर उतरत आहेत, हे सरकारचे मोठे अपयश आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्यांनी सरकारला आवाहन केले की, एखादा जबाबदार प्रतिनिधी पाठवून विद्यार्थ्यांशी तातडीने चर्चा करावी आणि तोडगा काढावा. रोहित पवार यांनी एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीला पाठिंबा दिला आणि त्यांच्या जागी स्वच्छ प्रतिमेच्या अधिकार्‍याची नियुक्ती करण्याची मागणी केली. ते म्हणाले की, हा भ्रष्टाचार सरकारच्या वरदहस्ताशिवाय होऊ शकत नाही, त्यामुळे याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.

एमपीएससी अध्यक्षांचे आरोपांवर स्पष्टीकरण
कथित पेपरफुटी प्रकरणी वाढत्या विरोधानंतर आणि राजीनाम्याच्या मागणीनंतर, आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. भीमनवार यांनी स्पष्ट केले की, प्रश्नपत्रिका फुटीची घटना जानेवारी 2026 मधील आहे, तर त्यांनी स्वतः 18 फेब्रुवारीला नियुक्ती होऊन 3 मार्च 2026 रोजी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला होता. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळापूर्वी घडलेल्या घटनेवरून राजीनामा मागणे चुकीचे आहे. पेपरफुटीत आपल्या सहभागाचे पुरावे समोर आल्यास तत्काळ राजीनामा देऊ. आपण एक क्षणही पदावर राहणार नाही, अशी प्रतिक्रियाही भीमनवार यांनी दिली आहे.

MPSC students’ protest march

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

7 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

7 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

7 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

7 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

7 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

7 hours ago