नाशिक

बंद शाळांना शैक्षणिक वैभय प्राप्त करून देणार

आठवडाभरात शाळांचा अहवाल सादर होणार

नाशिक : प्रतिनिधी
पटसंख्येअभावी बंद पडलेल्या महापालिकेच्या शाळा पुन्हा सुरू करून त्यांना गतवैभव मिळवून देण्यासाठी विशेष नियोजन करण्यात येत आहे. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, सेमी इंग्रजी माध्यम, गुणवत्तापूर्ण शिक्षक, कला-क्रीडा सुविधा आणि आधुनिक शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून दिले जाईल. आठवडाभरात नाशिकमधील शाळांचा अहवाल महापौरांसमोर सादर केला जाईल, अशी माहिती शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली.
शिक्षण विषयावरील आढावा बैठकीनंतर महापौर हिमगौरी आडके, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी सभापती मच्छिंद्र सानप, प्रशासन अधिकारी मिता चौधरी आणि संबंधित पदाधिकार्‍यांनी बंद शाळा पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टीने नियोजन केले आहे. त्यानुसार प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यातील पाच ते सहा शाळा किरकोळ दुरुस्ती, रंगरंगोटी आणि आवश्यक सुविधांच्या माध्यमातून तातडीने सुरू करता येऊ शकतात. काही संस्था सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) मदत देण्यास इच्छुक असून, कंपन्यांना शाळा दत्तक देण्यासही प्राधान्य दिले जाणार आहे. मात्र, शाळांच्या इमारतींचा शैक्षणिक कामाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही कारणासाठी वापर होऊ दिला
जाणार नाही.
पालकांचा इंग्रजी माध्यमाकडे वाढता कल लक्षात घेऊन शाळांमध्ये सेमी इंग्रजी सुरू करण्याचा विचार आहे. उच्चशिक्षित आणि गुणवत्तापूर्ण शिक्षकांच्या माध्यमातून
विद्यार्थ्यांच्या कला, क्रीडा आणि अन्य कौशल्यांना वाव देणारे व्यासपीठ निर्माण केले जाईल. शिक्षक भरतीतूनही सक्षम शिक्षक उपलब्ध होतील. स्पर्धेच्या युगात महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी मागे राहू नयेत, यासाठी शैक्षणिक सुविधांमध्ये आवश्यक बदल करण्यात येतील. महापालिकेच्या माध्यमातूनच या शाळांना पुन्हा गतवैभव प्राप्त करून देता येईल, असा विश्वास ना. दादा भुसे यांनी व्यक्त केला.

शेतकर्‍यांना मदतीची ग्वाही
नाशिक जिल्ह्यातील दोन ते तीन तालुके अद्याप दुष्काळी निकषांत समाविष्ट होण्यापासून राहिले आहेत. पावसातील खंडामुळे आगामी काळात त्यांचाही समावेश होण्याची शक्यता आहे. एखादा तालुका निकषांत बसत नसला तरी प्रत्यक्ष पीक नुकसान आणि शेतकर्‍यांची परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेण्याचे आदेश मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे नुकसान झालेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही दादा भुसे यांनी दिली.

 

Will restore the educational glory of closed schools.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

कांद्याचा का होतो नेहमीच वांधा?

- आनंदा जाधव भल्याभल्यांना घाम फोडणारा आणि प्रसंगी केंद्रातील सत्तासमीकरणेही बदलणारा कांदा नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी…

9 hours ago

ये तो होना ही था!

- देवयानी सोनार पार्टी वुईथ डिफरन्स अशी ओळख असलेल्या भारतीय जनता पार्टीमध्ये अलीकडच्या काळात पक्षशिस्तीचे…

9 hours ago

1972 ते 2026 : दुष्काळ बदलला, पण प्रश्न तेच

- किशोर जाधव ज्या पिढीने 1972 चा दुष्काळ अनुभवला, ती पिढी आता साठीच्या पुढे आहे.…

9 hours ago

मदतीची शिक्षा!

- अशोक थोरात समाजात प्रामाणिकपणा उरला आहे की नाही, अशी शंका येणार्‍या अनेक घटना सातत्याने…

9 hours ago

गुरू नानक : समता, सेवा आणि मानवतेचा प्रकाश

नवी संस्कृतीच्या इतिहासात काही महापुरुषांनी आपल्या विचारांनी, कार्याने आणि जीवनमूल्यांनी समाजाला नवी दिशा दिली. त्यांनी…

9 hours ago

धर्मनिरपेक्ष भगवी वाट

उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होणार्‍या विधानसभा निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी तयारीला वेग…

10 hours ago