पालकांना पसंतीच्या दुकानांतून खरेदीची मुभा; शिक्षण विभागाचे परिपत्रक
सिन्नर : प्रतिनिधी
विद्यार्थ्यांच्या गणवेश, वह्या-पुस्तके तसेच इतर शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी काही शाळांकडून ठराविक दुकानांची सक्ती केल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर शिक्षण विभागाने स्पष्ट भूमिका घेतली आहे. राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांनी विद्यार्थ्यांना गणवेश किंवा शैक्षणिक साहित्य ठराविक दुकानांतूनच खरेदी करण्यास भाग पाडू नये, असे स्पष्ट निर्देश देत माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षण संचालनालयाने संयुक्त परिपत्रक जारी केले आहे.
माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर तसेच प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी 14 एप्रिल 2026 रोजी हे परिपत्रक काढले असून, राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक तसेच प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकार्यांना याबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
अनेक शाळांकडून पालकांना विशिष्ट दुकान किंवा विक्रेत्यांकडूनच गणवेश, वह्या, पुस्तके व इतर साहित्य खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे येत होत्या. या पार्श्वभूमीवर शासनाने पालकांच्या सोयीचा विचार करून हे परिपत्रक जारी
केले आहे.
परिपत्रकानुसार, पालकांना आपल्या पसंतीच्या व सोयीच्या दुकानातून गणवेश व शैक्षणिक साहित्य खरेदी करण्याचा पूर्ण अधिकार आहे.
कोणत्याही शाळेने त्यावर निर्बंध घालू नयेत. राज्य मंडळाबरोबरच सीबीएसई व आयसीएसई बोर्डांच्या शाळांनाही हे नियम लागू राहणार आहेत. तसेच शाळांनी एनसीईआरटी किंवा एससीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त विशिष्ट प्रकाशकांची पुस्तके घेण्याची सक्ती करू नये, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित शाळांविरुद्ध शिक्षणाधिकारी किंवा प्रशासन अधिकारी चौकशी करून आवश्यक कारवाई करतील, असा इशाराही शिक्षण विभागाने दिला आहे.
Curb schools’ compulsion in purchasing uniforms and materials!
आयपीएल अर्थात, इंडियन प्रीमियर लीगचे हे एकोणिसावे वर्ष आहे. सलग एकोणीस वर्षे आपली लोकप्रियता टिकवून…
चार वर्षांपूर्वी म्हणजे 24 फेब्रुवारी 2022 रोजी रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाले. या युद्धाचा परिणाम जगावर…
‘आयपीएल’च्या धर्तीवर खेळाडूंचा लिलाव; 16 संघांमध्ये रंगणार टेनिस बॉल डे-नाईट स्पर्धा सिन्नर : प्रतिनिधी सिन्नर…
उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार कळवण : प्रतिनिधी प्रसूतीसाठी कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या मातेचा प्रसूतीनंतर काही…
नाशिक : प्रतिनिधी शहरात अलीकडे घडलेल्या विविध घटनांमधून महिलांचे लैंगिक शोषण तसेच धर्मांतरणासारख्या प्रकारांचा पर्दाफाश…
सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, दिंडोरीत सर्वाधिक मृत्यू नाशिक : देवयानी सोनार मालेगाव येथील साक्षी वनीस व सीमा…