‘आयपीएल’च्या धर्तीवर खेळाडूंचा लिलाव; 16 संघांमध्ये रंगणार टेनिस बॉल डे-नाईट स्पर्धा
सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नर तालुक्यातील स्थानिक क्रिकेटपटूंना मोठे व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने सिन्नर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले यांच्या संकल्पनेतून आणि ‘व्ही राजे ग्रुप’च्या वतीने आयोजित ‘छत्रपती करंडक 2026’ या भव्य टेनिस बॉल डे-नाईट क्रिकेट स्पर्धेचा शानदार शुभारंभ आज शनिवारी (दि. 18) सायंकाळी 7 वाजता आडवा फाटा येथील वंजारी समाज मैदानावर होणार आहे.
तालुक्यातील क्रिकेटप्रेमींमध्ये या स्पर्धेबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली असून, आठ दिवस चालणार्या या स्पर्धेत अनेक तगडे संघ विजेतेपदासाठी आमनेसामने येणार आहेत. दररोज दुपारी 2 वाजल्यापासून (डे-नाईट सामने) खेळवले जाणार आहेत.
या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे आयपीएलच्या धर्तीवर खेळाडूंचा ‘ऑक्शन’ (लिलाव) घेण्यात आला. तालुक्यातील विविध भागांतील खेळाडूंवर संघमालकांनी बोली लावून संघ तयार केले आहेत. स्पर्धा साखळी पद्धतीने खेळवली जाणार असल्याने प्रत्येक खेळाडूला आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे. पारदर्शकतेसाठी स्पर्धेत बाहेरील पंचांची नियुक्ती करण्यात आली आहे.
स्पर्धेमुळे सिन्नरचे
नाव उंचावेल…
सिन्नर तालुक्यातील खेळाडूंमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. योग्य संधी मिळाली तर ते मोठ्या पातळीवर झेप घेऊ शकतात. ‘ऑक्शन’ पद्धतीमुळे खेळाडूंना स्वतःची वेगळी ओळख मिळाली असून, या स्पर्धेमुळे सिन्नरचे नाव क्रीडा क्षेत्रात नक्कीच उंचावेल.
– विठ्ठलराजे उगले, नगराध्यक्ष
विजेत्यांना लाखोंची पारितोषिके
स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे. प्रथम पारितोषिक 1 लाख, द्वितीय पारितोषिक 61 हजार, तृतीय पारितोषिक 51 हजार आणि चतुर्थ पारितोषिक 41 हजार रुपये ठेवण्यात आले आहे. याशिवाय, विजेत्या संघाच्या मालकाला इलेक्ट्रिक स्कूटर भेट देण्यात येणार आहे. प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉद्वारे चार सायकली जिंकण्याची संधीही उपलब्ध असणार आहे.
16 संघांमध्ये रंगणार लढत
या स्पर्धेत तालुक्यातील 16 संघ सहभागी झाले असून, त्यामध्ये कुंदेवाडी लायन्स, फोन बुक सुपर किंग्स, शिवतेज सुपर किंग्स, उमंग 2021, बालाजी इंटरप्रायजेस, श्री गणेश 11, ओके बादशाह दोडी, बीएमडब्ल्यू इंडियन्स, क्रांतिसूर्य महात्मा फुले, गुळवंच नाईट रायडर, छत्रपती 11, महाकाल स्ट्रायकर्स, नायगाव क्रिकेट क्लब, नीलकंठ सीएनजी, एमसीसी दातली आणि डुबेरे स्ट्रायकर्स या संघांचा समावेश आहे.
थेट प्रक्षेपण आणि समालोचन
स्पर्धेची रंगत वाढवण्यासाठी मनोज बेल्हेकर, अजित पवार, शुभम आहिरे, शाहरुख पठाण आणि संदीप बोराडे यांची समालोचक टीम सज्ज असून, गजाननभाऊ दांगट यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेचे यूट्यूबवर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. प्रत्येक सामन्यातील ‘सामनावीर’ पुरस्कारांचे प्रायोजक वैभव मुत्रक आहेत.
Cricket epic begins in Sinnar from today
आयपीएल अर्थात, इंडियन प्रीमियर लीगचे हे एकोणिसावे वर्ष आहे. सलग एकोणीस वर्षे आपली लोकप्रियता टिकवून…
चार वर्षांपूर्वी म्हणजे 24 फेब्रुवारी 2022 रोजी रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाले. या युद्धाचा परिणाम जगावर…
पालकांना पसंतीच्या दुकानांतून खरेदीची मुभा; शिक्षण विभागाचे परिपत्रक सिन्नर : प्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या गणवेश, वह्या-पुस्तके तसेच…
उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार कळवण : प्रतिनिधी प्रसूतीसाठी कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या मातेचा प्रसूतीनंतर काही…
नाशिक : प्रतिनिधी शहरात अलीकडे घडलेल्या विविध घटनांमधून महिलांचे लैंगिक शोषण तसेच धर्मांतरणासारख्या प्रकारांचा पर्दाफाश…
सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, दिंडोरीत सर्वाधिक मृत्यू नाशिक : देवयानी सोनार मालेगाव येथील साक्षी वनीस व सीमा…