मनमाड : प्रतिनिधी
शहरातून जाणार्या इंदूर-पुणे महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. बुधवारी (दि. 7) पुन्हा एक भीषण अपघात घडला आहे. येथील संत बार्णबा शाळेसमोर आयशर ट्रकखाली सापडल्याने 19 वर्षीय युवतीचा जागीच मृत्यू झाला, तर तिच्यासोबत असलेला पाच वर्षांचा चिमुरडा गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे मनमाड शहरात हळहळ व्यक्त होत आहे. कोमल पगारे असे मृत युवतीचे नाव आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे- बुधवारी पुण्याकडून मालेगावकडे जाणार्या आयशर ट्रक (यूपी 25 एफटी 2249) समोर अचानक कोमल पगारे ही युवती आली. वाहनचालकाने तातडीने ब्रेक लावून तिला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, वेगातील ट्रकवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले. हा अपघात इतका भीषण होता की, कोमल ही ट्रकखाली तब्बल 50 ते 60 फूट घसरत गेली. गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.अपघाताच्या वेळी कोमलसोबत असलेला पाच वर्षांचा बालकही गंभीर जखमी झाला.
अपघात घडताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली आणि तातडीने मदतकार्य सुरू केले. नागरिकांनी जखमी बालकाला तत्काळ मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच मनमाड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि वाहतूक कोंडी सुरळीत केली.
महामार्ग बनला मृत्यूचा सापळा
हा महामार्ग सध्या वाहनधारकांसाठी आणि पादचार्यांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. अपघात घडलेल्या भागात संत बार्णबा शाळा आहे. विद्यार्थ्यांची आणि नागरिकांची येथे सतत वर्दळ असते. या परिसरात वाहनांचा वेग मर्यादित ठेवण्यासाठी नॅशनल हायवे अथॉरिटीने त्वरित गतिरोधक (स्पीड ब्रेकर्स) बसवावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. ‘नॅशनल हायवे अॅथॉरिटी अजून किती निष्पाप नागरिकांचे बळी घेणार?’ असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य जनतेकडून उपस्थित केला जात आहे.
Young woman crushed to death by Eicher truck; accident on Manmad-Indore-Pune highway; child critically injured.
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः। यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः॥ भावार्थ : जिथे स्त्रीचा…
- मनीषा चौधरी चित्रपटसृष्टीत सध्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे तो म्हणजे, नितेश तिवारी दिग्दर्शित आणि…
- डॉ. किशोर पवार मानवी शरीरासाठी जीवनसत्त्वाचे महत्त्व किती अनन्यसाधारण आहे याची कल्पना सर्वांनाच आहे.…
- ज्योती काळे-जाधव अलीकडच्या काळात घडणार्या आत्महत्यांच्या घटना मनाला अस्वस्थ करून जातात. पुण्याची पायल, काल…
- प्रणाली देशमुख तसा खूप मोठा परिवार आहे यांचा! पिढ्यान्पिढ्या आपल्याला अगदी मनपसंद, चमचमीत, तिखट-गोड…
- वाहिद बागवान रस्ता कुठे जातो, हे सांगण्यासाठी उभारलेल्या दिशादर्शक कमानींवर आता कोणत्या नेत्याचा वाढदिवस…