नाशिक

दीड तासात 37 मि.मी. पाऊस, आज यलो अलर्ट

नाशिक : प्रतिनिधी
नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी सोमवारी सायंकाळी शहरात पावसाला सुरुवात झाली दीड तासात 37 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सकाळपासून ढगाळ वातावरण होते. मात्र, दिवसभर पावसाने विश्रांती घेतल्यानंतर सायंकाळच्या सुमारास जोरदार पाऊस झाला.
दीड तास झालेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते. गेल्या काही दिवसांपासून शहरात जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहे. मागील आठवड्यातदेखील मुसळधार पाऊस झाला. मे महिन्यापासून जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे सर्वच धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. नाशिक जिल्ह्याला दि. 19 पासून 23 सप्टेंबरपर्यंत यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे आज, मंगळवारीदेखील शहरात पाऊस होण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यासह राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांंना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील 14 धरणांतून विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यात होत असलेल्या सततच्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. पावसामुळे शेतात पाणी साचून पिके सडून जात आहेत. फळबागांचे अतोनात नुकसान होत असल्याने जिल्ह्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. जिल्ह्यातील धरणांंत 99.11 टक्के साठा असून, नाशिक शहराला पाणीपुरवठा करणार्‍या गंगापूर धरणात 98.85 टक्के जलसाठा आहे. त्यामुळे जिल्हावासीयांचे पाणीटंचाईचे संकट दूर झाले असले, तरी अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे.

तरुणाईचा हिरमोड

नवरात्रोत्सवात तरुणवर्गाला गरबा, दांडियाचे आकर्षण असते. मात्र, पहिल्याच दिवशी पाऊस झाल्याने तरुणाईचा हिरमोड झाला आहे. दरम्यान, पावसाची शक्यता लक्षात आयोजकांनी गरबा नाइट्स व दांडियासाठी वॉटरप्रूफ डोमची निर्मिती केली आहे.

जिल्ह्यातील धरणांतून विसर्ग

दारणा 850, गंगापूर 276, वालदेवी 107, आळंदी 87, भावली 135, भाम 374, वाघाड 206, पालखेड 433, नांदूरमध्यमेश्वर 3155, करंजगाव 301, कडवा 840, तिसगाव 31, गौतमी गोदावरी 144, कश्यपी 160, मुकणे 363.

 

Editorial Team

Recent Posts

डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा निकाल

- कुबेर जाधव केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला आहे. जाहीर करण्यात रिझल्टनुसार, एकूण बसलेल्या…

2 hours ago

देशातील तपास यंत्रणा

- अशोक थोरात गैरकारभार, घोटाळे, अफरातफर, लाच घेणार्‍यांसाठी सीबीआय, ईडी, लाचलुचपत प्रतिबंधकसह काही संस्था देशात…

2 hours ago

साखर कारखानदारीची घरघर थांबणार कधी?

- आनंदा जाधव काही दशकांपूर्वी राज्यातील बहुसंख्य जिल्ह्यांत साखर कारखानदारी बहरली होती. मुबलक उसामुळे अगदी…

3 hours ago

…आणि मी प्रेमात पडतो!

- प्रशांत पोतदार काही गोष्टींचं कारण आपल्याला कधीच कळत नाही. कुणीतरी मनापासून हसतं आणि आपल्यालाही…

3 hours ago

समाजकल्याण की कोटकल्याण?

- गोरख काळे गरीब कुटुंबातील महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उदात्त हेतूने नाशिक महापालिकेच्या महिला व बालकल्याण…

3 hours ago

दिवाळीचा आनंद प्रत्येक घटकापर्यंत पोहोचू द्या!

दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव, आनंदाची उधळण, नात्यांमधील गोडवा आणि नव्या आशांचा जागर. घराघरांत दिवे लागतात,…

3 hours ago