निफाड पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल
निफाड : तालुका प्रतिनिधी
येथील स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) शाखेशी संलग्न असलेल्या कॅश डिपॉझिट मशिनमध्ये (सीडीएम) पाचशे रुपयांच्या तब्बल 47 बनावट नोटा जमा झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या नोटांचे एकूण मूल्य 23 हजार 500 रुपये आहे. बँकेच्या तपासणीत या सर्व नोटा बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी बँकेच्या फिर्यादीवरून निफाड पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
निफाड शाखेचे उपव्यवस्थापक (रोकड विभाग) हेमंत अशोकराव पाटील यांनी याप्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली आहे. 13 नोव्हेंबर 2026 रोजी दुपारी 2 ते 3 वाजेच्या सुमारास सीडीएम मशिन बंद पडल्याची माहिती मुख्य कार्यालयाकडून शाखेला मिळाली. मशिनमध्ये नोट अडकल्याच्या संशयावरून उपशाखा प्रबंधक सीमा जगताप आणि सहाय्यक सागर घुमरे यांनी मशिन उघडून तपासणी केली.
यावेळी मशिनच्या रिजेक्टेड बिन कॅसेटमध्ये 500 रुपयांच्या 47 नोटा आढळल्या. बँकेच्या नोट सॉर्टिंग मशिनवर तपासणी केली असता या सर्व नोटा बनावट असल्याचे स्पष्ट झाले. तांत्रिक अडचणींमुळे सेवा व्यवस्थापक शीतल पाटील यांनी तत्काळ व्हॉट्सअॅपद्वारे ग्रामीण क्षेत्रीय कार्यालयाला घटनेची कल्पना दिली. त्यानंतर 16 नोव्हेंबर रोजी नाशिक क्षेत्रीय कार्यालयाला सविस्तर अहवाल पाठवण्यात आला. 18 नोव्हेंबर रोजी बँकेने सीडीएम मशिनच्या व्यवहारांची सखोल तपासणी केली असता, बनावट नोटा जमा झालेल्या व्यवहाराचा खाते क्रमांक समोर आला. हे खाते नाशिकरोड येथील जेलरोड शाखेतील संरक्षण निवृत्तिवेतनधारक संदीप रंगनाथ निकम यांचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. या खात्याशी संलग्न एटीएम कार्डचा वापर करून 3 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 9:41 ते 9:45 या वेळेत निफाड शाखेच्या सीडीएम मशिनमध्ये या 47 नोटा जमा करण्यात आल्या होत्या.
बनावट नोटा खर्या असल्याचे भासवून बँकेची फसवणूक व आर्थिक लाभ मिळवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. पुढील तपास पोलिस निरीक्षक सारिका अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सोनल फडोळ करत आहेत.
47 counterfeit 500-rupee notes deposited at SBI branch
- आनंदा जाधव भल्याभल्यांना घाम फोडणारा आणि प्रसंगी केंद्रातील सत्तासमीकरणेही बदलणारा कांदा नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी…
- देवयानी सोनार पार्टी वुईथ डिफरन्स अशी ओळख असलेल्या भारतीय जनता पार्टीमध्ये अलीकडच्या काळात पक्षशिस्तीचे…
- किशोर जाधव ज्या पिढीने 1972 चा दुष्काळ अनुभवला, ती पिढी आता साठीच्या पुढे आहे.…
- अशोक थोरात समाजात प्रामाणिकपणा उरला आहे की नाही, अशी शंका येणार्या अनेक घटना सातत्याने…
नवी संस्कृतीच्या इतिहासात काही महापुरुषांनी आपल्या विचारांनी, कार्याने आणि जीवनमूल्यांनी समाजाला नवी दिशा दिली. त्यांनी…
उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होणार्या विधानसभा निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी तयारीला वेग…