सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात लाल कांद्याची आवक दिवसेंदिवस वाढत आहे. बाजारभावही समाधानकारक मिळत आहेत. सोमवारी (दि. 23) झालेल्या लिलावात लाल कांद्याला कमाल 4,300 रुपये प्रतिक्विंटल असा उच्चांकी दर मिळाला. सिन्नर येथील शेतकरी गणेश लोंढे यांच्या कांद्याला हा दर मिळाला आहे. सरासरी भाव 4,100 रुपये प्रतिक्विंटल राहिला.
बाजार समितीच्या आवारात सकाळी अकरा वाजता कांदा लिलावाला सुरुवात झाली. यावेळी लाल कांद्याची आवक लक्षणीय होती. उन्हाळ कांद्याची आवक सुमारे 25 टक्क्यांच्या दरम्यान आहे. त्याला कमाल 4,150 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. शेतकरी विठ्ठल लोणारे यांच्या उन्हाळ कांद्याला हा भाव मिळाला. उन्हाळ कांद्याचा सरासरी दर 3,900 रुपये प्रतिक्विंटल राहिला.
लिलावासाठी बाळासाहेब चकोर, दिलीप खिवंसरा, बाबुशेठ लढ्ढा, सतीश चकोर, सुनील चकोर, जय पन्हाळे, पप्पू गोळेसर, सुजित भाबड, विनोद जाधव, तुषार कलंत्री, मंगेश कर्पे, नागेश लहामगे, पंकज नाईक आदी व्यापारी उपस्थित होते. लिलावानंतर बाजार समितीच्या कार्यालयातून शेतकर्यांना त्वरित रोख पेमेंट मिळत असल्याने उपस्थित शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले.
बाजार आवारातच शेतमाल विक्रीचे आवाहन
शेतकर्यांनी कांदा व धान्य-भुसार शेतमालाची बांधावर परस्पर विक्री न करता बाजार समितीच्या आवारातच विक्रीला प्राधान्य द्यावे, असे आवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यालयातून त्वरित रोख पेमेंटची सुविधा उपलब्ध असल्याने शेतकर्यांनी
निःसंकोचपणे शेतमाल विक्रीसाठी आणावा, असे आवाहन सभापती शरदराव थोरात, उपसभापती सिंधूताई कोकाटे, सचिव विजय विखे यांच्यासह संचालक मंडळाने केले आहे.
Record-high price of ₹4,300 for red onions
- आनंदा जाधव भल्याभल्यांना घाम फोडणारा आणि प्रसंगी केंद्रातील सत्तासमीकरणेही बदलणारा कांदा नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी…
- देवयानी सोनार पार्टी वुईथ डिफरन्स अशी ओळख असलेल्या भारतीय जनता पार्टीमध्ये अलीकडच्या काळात पक्षशिस्तीचे…
- किशोर जाधव ज्या पिढीने 1972 चा दुष्काळ अनुभवला, ती पिढी आता साठीच्या पुढे आहे.…
- अशोक थोरात समाजात प्रामाणिकपणा उरला आहे की नाही, अशी शंका येणार्या अनेक घटना सातत्याने…
नवी संस्कृतीच्या इतिहासात काही महापुरुषांनी आपल्या विचारांनी, कार्याने आणि जीवनमूल्यांनी समाजाला नवी दिशा दिली. त्यांनी…
उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होणार्या विधानसभा निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी तयारीला वेग…