नाशिक

सोनोग्राफीसह गर्भपात सेंटर रडारवर

तीस पथकांकडून तपासणी सुरू

नाशिक : प्रतिनिधी
शहरातील रुग्णालयांसह सोनोग्राफी सेंटर व गर्भपात सेंटरची तपासणी नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने हाती घेतली आहे. आतापर्यर्ंत 424 सोनोग्राफी सेंटरपैकी 58 सेंटरची व 181 पैकी 120 गर्भपात सेंटरची तपासणी झाली आहे. तपासणीत अनधिकृत बाबी आढळल्यास संबंधित सेंटरवर कारवाई केली जाणार आहे.
सहाही विभागांत विभागीय वैद्यकीय अधिकार्‍याच्या उपस्थितीत तपासण्या सुरू असून, तीस पथकांची नियुक्ती याकरिता केली आहे. पथकात वैद्यकीय अधिकार्‍यासह दोन डॉक्टर व एक परिचारिकेचा समावेश आहे. सेंटरबरोबरच रुग्णालयांचीही तपासणी सुरू आहे. महाराष्ट्र नर्सिंग होम अ‍ॅक्टनुसार नियमांचे कुठे उल्लंघन होत आहे का? हे तपासले जात आहे. वर्षातून दोनदा ही मोहीम हाती घेतली जाते. पहिल्या टप्प्यात जानेवारी ते जूनदरम्यान, तर दुसर्‍या टप्प्यात ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत तपासणी होते. वैद्यकीय विभाग रुग्णालये, सोनोग्राफी सेंटर, गर्भपात केंद्रांची तपासणी करत असताना दुसरीकडे आयव्हीएफ सेंटरकडेही लक्ष दिले असून, त्यांचीही तपासणी सुरू आहे. शहरात एकूण 43 आयव्हीएफ सेंटर असून, त्यांपैकी 20 सेंटरची तपासणी पूर्ण झाली आहे. बदलापूर (जि. ठाणे) येथे झालेल्या स्त्रीबीज तस्करी प्रकरणात मुंबई नाका येथील मालती आयव्हीएफ सेंटरवर महापालिकेने कारवाई करत त्याचा परवाना रद्द करून ते सील केले होते.

फायर सेफ्टीसाठी 674 रुग्णालयांना नोटिसा
राज्यात ठिकठिकाणी होत असलेल्या आगीच्या दुर्घटना पाहता वैद्यकीय विभागाने शहरातील 674 रुग्णालयांना नोटिसा देत फायर सेफ्टीची पूर्तता करण्यास सांगितले आहे.

नोव्हेंबरपर्यंत शहरातील सर्व रुग्णालये, सोनोग्राफी सेंटर, गर्भपात सेंटर व आयव्हीएफ सेंटर तपासणीचे काम हाती घेतले आहे. यासाठी तीस पथकांची नियुक्ती केली असून, त्यांच्यामार्फत काम सुरू आहे.
– डॉ. प्रशांत शेटे, आरोग्य अधिकारी, मनपा

अशी होते तपासणी
रजिस्टर तपासणी
बेडची संख्या
फायर सेफ्टी प्रमाणपत्र
नगररचना प्रमाणपत्र
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमाणपत्र

Abortion centers with sonography facilities under scrutiny

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

गावातून धिंड : ’नाशिक जिल्हा-कायद्याचा बालेकिल्ला’च्या दिल्या घोषणा

मखमलाबाद येथे डॉक्टरला मारहाण, दोन आरोपींना अटक पंचवटी : प्रतिनिधी मखमलाबाद बसस्टँड परिसरात भाजीपाला घेण्यासाठी…

20 hours ago

बायकोच्या वाढदिवसाचे नाटक करून गल्ला लंपास

पुण्याचा सराईत चोर उपनगर पोलिसांच्या जाळ्यात नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी बायकोचा वाढदिवस आहे; चांगले कपडे…

20 hours ago

गुजरातमधून आलेली 2,155 किलो बर्फी जप्त

अन्न प्रशासनाचा कारवाईचा धडाका नाशिक : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने भेसळयुक्त अन्नपदार्थाविरुद्ध…

20 hours ago

भविष्यात ‘एआय’ उठणार माणसाच्या जीवावर?

कमांड न स्वीकारता स्वतःच्या बुद्धीने घेणार निर्णय; मानवी अस्तित्वाला धोक्याचा इशारा मुंबई : प्रतिनिधी आर्टिफिशियल…

20 hours ago

हरितालिका पूजनानंतर होणार श्रीगणेशाचे आगमन

31 वर्षांनंतर दुर्मिळ योग; सकाळी पूजन, मध्यान्ही बाप्पाची स्थापना नाशिक : प्रतिनिधी हरितालिकेची पूजा आणि…

20 hours ago

सातशेपैकी 20 गणेश मंडळांनाच परवानगी

प्रमाणपत्राची पूर्तता न झाल्याने अर्ज प्रलंबित नाशिक : प्रतिनिधी महापालिका प्रशासनाने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना उत्सवाच्या…

20 hours ago