तीन हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात
सिडको : प्रतिनिधी
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पुरोहित संघाच्या वतीने आयोजित ध्वजारोहणासह धर्मध्वज प्रदक्षिणा, नगरप्रदक्षिणा आणि गोदाआरती या कार्यक्रमांसाठी पोलिसांनी व्यापक सुरक्षाव्यवस्था केली आहे. 30 आणि 31 ऑक्टोबर रोजी होणार्या या कार्यक्रमांसाठी तीन हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. गोदाघाट परिसर, रामकुंड, कुशावर्त आणि प्रमुख कार्यक्रमस्थळांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात
आले आहे.
विशेष पोलिस महानिरीक्षक प्रवीण पडवळ यांनी गुरुवारी सुरक्षाव्यवस्थेची पाहणी करून बंदोबस्ताचा आढावा घेतला. केंद्रीय समितीच्या माध्यमातूनही रामकुंड, कुशावर्त आणि अन्य कार्यक्रमस्थळांच्या सुरक्षेची तपासणी करण्यात आली. भाविकांची संभाव्य गर्दी, वाहतूक नियोजन तसेच अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षित ये-जा करण्याच्या व्यवस्थेबाबत संबंधित अधिकार्यांना सूचना देण्यात आल्या.
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या निर्देशानुसार धर्मध्वज शोभायात्रा, नगरप्रदक्षिणा, सिंहस्थ ध्वजारोहण आणि गोदाआरतीसाठी बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्यक्ष पाहणीच्या आधारे भाविकांसाठी घाटापर्यंत पोहोचण्याचे मार्ग, वाहतुकीचे नियमन आणि महत्त्वाच्या व्यक्तींच्या वाहनांच्या हालचालींची व्यवस्था निश्चित करण्यात आली. या पाहणीवेळी पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त, विविध पोलीस ठाण्यांचे निरीक्षक तसेच गुन्हे शाखेचे अधिकारी उपस्थित होते. सिंहस्थ सोहळ्याच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच संभाव्य हवाई धोक्यांचा प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या संपूर्ण कार्यक्षेत्रात ‘नो ड्रोन फ्लाय झोन’ लागू करण्यात आला आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. गुरुवार, 29 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून शनिवार, 31 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत. या कालावधीत ड्रोन उडविणे, त्याद्वारे छायाचित्रण किंवा चित्रीकरण करणे आणि अन्य कोणत्याही कारणासाठी ड्रोनचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे.कार्यक्रमांच्या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने पोलिसांकडून सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून बंदोबस्तासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Tight security arrangements in Nashik for the Simhastha event
पहाटेच्या वेळी कानावर पडणारा पक्ष्यांचा गोड, मधुर अन् मंजूळ किलबिलाट कोणाला बरं आवडत नाही? सूर्य…
महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार आणि कर्नाटक या मोठ्या राज्यांतील विधान परिषदांच्या पदवीधर व शिक्षकांच्या 28…
नरेंद्र महाराज : ‘जेन झी’च्या ताकदीचे 42 उपक्रमांतून दर्शन घडवणार सिडको : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या…
चौकाचौकात भगव्या पताका, घरांवरही फडकले ध्वज नाशिक : प्रतिनिधी महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख…
आठ लाखांहून अधिक प्रवाशांची आतापर्यंत नोंदणी नाशिक : प्रतिनिधी दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली…
व्यावसायिकांची कोंडी; व्हीआयपींच्या स्वागताच्या मुद्यावरून नाराजीनाट्य त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या ध्वजारोहणाच्या त्र्यंबक…