पहाटेच्या वेळी कानावर पडणारा पक्ष्यांचा गोड, मधुर अन् मंजूळ किलबिलाट कोणाला बरं आवडत नाही? सूर्य उगवण्याआधीच पहाटेच्या वेळी वातावरण अगदी आनंदमय होऊन जाते. झाडांच्या फांद्यांवरून येणारा तो गोड मंजूळ आवाज केवळ निसर्गाचेच सौंदर्य वाढवत नाही, तर तोच आवाज प्रत्येकाच्या जीवनात रोज एक नवी दिशा, नवी आशा आणि नव्या दिवसाची नवी उमेद घेऊन येतो. सूर्य उगवला की, हीच पाखरे स्वतःच्या पंखांमध्ये बळ भरून आकाशात उंचच उंच भरारी घेऊन झेप घेतात. या भरारीमागे या पाखरांचा फक्त एकच उद्देश असतो, तो म्हणजे आपल्या इवल्या इवल्या आणि छोट्याशा पिलांसाठी आणि
स्वतःसाठी दाणापाण्याची सोय करणे. दिवसभर शेतात, रानावनात, गल्लीबोळात भटकंती करून हीच पाखरे अन्नाचा एक-एक कण गोळा करायचा प्रयत्न करतात.
पण, सूर्यास्ताच्या आणि संध्याकाळच्या वेळी हीच पाखरे आपापल्या हक्काच्या घरट्यात परत यायचं आणि दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी घरट्यात येऊन शांततेची झोप घ्यावी, विश्रांती घ्यावी, असा ते विचार करतात. आणि हाच या पाखरांचा रोजचा दिनक्रम असतो. पण, एक माणुसकीच्या नात्याने जरा विचार करा, दिवसभराच्या कामानंतर सुट्टी झाली की, आपण जसे आपलं घर, आपलं कुटुंब, आपली मुलंबाळं यांच्याकडे घाईगडबडीत घराच्या दिशेने वाटचाल करतो, अगदी तसेच ही पाखरेदेखील दिवसभराच्या भटकंतीनंतर हीच थकलेली पाखरं जेव्हा आपल्या चोचीत टिपलेला दाणा घेऊन आपल्या पिलांसाठी परत येतात तेव्हा आणि त्याच वेळी त्यांना जर आपले हक्काचे घरटे जे त्यांनी एक एक गवताची काडी चोचीत धरून आणून खूप कष्टाने तयार केलेलं ते घरटे असलेले झाडच तिथे त्यांना दिसत नसेल, तर तेव्हा ते दृश्य पाहून त्या अबोल पाखरांची घालमेल आणि त्यांच्या इव्हल्याश्या मनाची काय अवस्था होत असेल? एका क्षणात त्यांच्या घरट्याचं होत्याचं नव्हतं झालेलं असेल आणि याच वृक्षतोडीमुळे काही क्षणात त्यांचे संपूर्ण विश्व उद्ध्वस्त झालेले असते. माणसाच्या वाढत्या हव्यासापोटी आणि विकासाच्या नावाच्या खाली मानवाने झाडावर चालवलेली कुर्हाड आणि प्रत्येक झाडांची होत असलेली कत्तल हा झाडाचा केवळ एक लाकडाचा ओंडका तोडत नाहीत, तर त्यासोबतच कित्येक मुक्या जिवांचा संसार उघड्यावर पाडत आहेत. त्यांचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत… माणूस स्वतःला या पृथ्वीवरचा सर्वांत बुद्धिमान प्राणी समजतो. या बुद्धीच्या ताकदीवर स्वतःच्या सोयीसाठी, टोलेजंग इमारतींसाठी, रुंद रस्त्यांसाठी आणि कारखान्यांसाठी तो एका झटक्यात शेकडो वर्षे जुनी झाडे तोडून त्या तोडलेल्या झाडांचे अस्तित्व, त्यांचा इतिहास आणि त्या दुर्लभ झाडांच्या प्रजातीही नष्ट करतो आहे. आणि हीच मानवी जीवनाची सर्वांत निंदनीय बाब आहे. आणि मानवजातीला लाजवणारी अतिशय गंभीर घटनादेखील आहे. केवळ विकासाच्या नावाखाली प्रत्येक, पशू, पक्षी, प्राणी, झाडी, वेली, नद्या, पर्यावरण याला हानी पोहोचवण्यासाठी धरणी मातेला उघडं बोडकं करून अतिशय घृणास्पद कृत्य आजचे उद्योजक करत आहेत. पण, झाड हे केवळ लाकूड नसते; ती अनेक पक्ष्यांची हक्काची वस्ती असते. झाडाच्या फांदीवर
सुगरणीने विणलेला सुंदर खोपा असतो, डोलीत राहणारे पोपट, चिमण्यांची लहान घरटी या सार्यांचा विचार माणूस झाड तोडताना का करत नाही?
स्वतःचा स्वार्थ, स्वतःचे अस्तित्व जोपासण्यासाठी त्याला दुसर्याचे अस्तित्व नष्ट करण्याचा अधिकार कोणी दिला? असा विचार त्याच्या मनामध्ये का बरं निर्माण होत नसेल. जेव्हा आपले घर थोडे जरी गळायला लागले किंवा घराला तडा गेला तरी लगेच आपण अस्वस्थ होतो. लगेच त्या गळत्या घराची डागडुजी करण्यासाठी तयार होतो; मग ज्या पाखरांचे अख्खे घरच डोळ्यांदेखत जमिनीवर कोसळते आहे.
तीन हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात सिडको : प्रतिनिधी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पुरोहित संघाच्या…
महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार आणि कर्नाटक या मोठ्या राज्यांतील विधान परिषदांच्या पदवीधर व शिक्षकांच्या 28…
नरेंद्र महाराज : ‘जेन झी’च्या ताकदीचे 42 उपक्रमांतून दर्शन घडवणार सिडको : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या…
चौकाचौकात भगव्या पताका, घरांवरही फडकले ध्वज नाशिक : प्रतिनिधी महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख…
आठ लाखांहून अधिक प्रवाशांची आतापर्यंत नोंदणी नाशिक : प्रतिनिधी दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली…
व्यावसायिकांची कोंडी; व्हीआयपींच्या स्वागताच्या मुद्यावरून नाराजीनाट्य त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या ध्वजारोहणाच्या त्र्यंबक…