पंचवटी / सिडको : प्रतिनिधी
नाशिक शहर गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने सराईत गुन्हेगार हसन कुट्टी याला अटक करत त्याच्याकडून मालाविरुद्धचे तीन गंभीर गुन्हे उघडकीस आणले. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.
दि. 4 मे रोजी सकाळी पोलीस अंमलदार राजेश राठोड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, पेठ रोड परिसरात संशयितरीत्या फिरत असलेल्या हसन कुट्टीला गुंडाविरोधी पथकाने सापळा रचून दत्तनगर येथे अटक केली. चौकशीत त्याने म्हसरूळ व मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या तिन्ही चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली.त्याने 10 फेब्रुवारी रोजी न्यू उत्तम हिरा (घुंगरू) हॉटेलमधून सुमारे 69 हजार 120 रुपयांची विदेशी दारू व रोख रक्कम चोरी केल्याचे मान्य केले.
तसेच नोव्हेंबर 2024 मध्ये त्याच हॉटेलमध्ये 2 लाखांची चोरी आणि एप्रिल 2025 मध्ये हॉटेल रसोई, मुंबई नाका येथे 46 हजार रुपयांची चोरी केल्याची कबुलीही दिली. या तिन्ही गुन्ह्यांमध्ये मुद्देमाल चोरीस गेल्याची नोंद आहे. हसन कुट्टी (वय 46, रा. नवनाथनगर, पेठ रोड) याच्यावर नाशिक शहर व ग्रामीण भागात एकूण 17 गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर पुढील कारवाईसाठी म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…