गंगापूर पोलिसांची मध्यरात्री कारवाई
सिडको : विशेष प्रतिनिधी
गंगापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मध्यरात्री सर्जिकल स्ट्राइकसदृश कारवाई करत तीन सराईत गुन्हेगारांना अटक केली. ही धडक कारवाई 3 मेच्या मध्यरात्री शिवाजीनगर परिसरात करण्यात आली.
पोलीस अंमलदार सुजित जाधव यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, एमपीडीअंतर्गत फरार राहुल जाधव, तडीपार राहिल सय्यद आणि खंडणी-हिंसाचारातील आरोपी अरबाज शेख हे तिघे एकत्र जमल्याचे समजताच गुन्हे शोध पथकाने शिवाजीनगर परिसरात सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी मोटारसायकलवरून पळ काढला. पोलिसांनी सातपूर-त्र्यंबक रोडवर थरारक पाठलाग करून महिरावणी गावाजवळ त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी मोटारसायकल सोडून शेतात पळ काढला. अखेर पोलिसांनी पाठलाग करून तिघांनाही अटक केली. यावेळी पोलिसांनी अटक केलेला मुख्य आरोपी राहुल जाधव (25) याच्यावर खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, खंडणी, जाळपोळ, विनापरवाना शस्त्र बाळगणे असे 8 गंभीर गुन्हे दाखल आहेत. अरबाज शेख (24) याच्यावर 6 तर राहिल सय्यद (24) याच्यावर 7 गुन्ह्यांची नोंद आहे.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…