बैलपोळ्याचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा

नाशिक : प्रतिनिधी
शेतकर्‍याच्या आयुष्यात वर्षभर साथ देणार्‍या बैलजोडीप्रति कृतज्ञता व्यक्त करणारा सण जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागात पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. बैलपोळ्याचा उत्साह केवळ ग्रामीण भागापुरता मर्यादित असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. शहरी भागात मातीच्या बैलाचे पूजन करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला.
ग्रामीण भागात बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना अंघोळ घालण्यात आली. शिंगे, नखे तसेच रंगरंगोटी करण्यात आली. पाठीवर झूल, गोंडे, घुंगरू लावून सजावट करण्यात आली.सायंकाळी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी खास पुरणपोळी व इतर गोडाधोडाचा नैवेद्य तयार करण्यात आला.
ग्रामीण भागात बैलांची मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी महिलांनी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून त्यांची पूजा केली.
काही ठिकाणी बैलजोडीची मिरवणूक ढोल-ताशांच्या गजरात आणि पारंपरिक वाद्यांसहित काढण्यात आली. मिरवणूक पाहण्यासाठी लहानथोरांनी गर्दी केली होती.
शेतीची कामे आता जवळपास 50 टक्के यांत्रिक पद्धतीने होत असली, तरी शेतकर्‍यांच्या जीवनात बैलाचे महत्त्व आजही कायम असल्याने शेतकर्‍यांसाठी बैलांप्रति नाते जपताना दिसून येते.
सोशल मीडियावर सजविलेल्या बैलांची मिरवणूक व फोेटो, व्हिडिओ व्हायरल करण्यात आले. यावेळी महिलांनी बैलजोडीचे पूजन व नैवेद्य दाखवितानाचे फोेटो अपलोड केले.
विविध रंगांनी सजलेले बैल आणि त्यांच्या गळ्यातील घुंगरांचा नाद त्याच्या जोडीला पारंपरिक वाद्यांची जोड यामुळे वातावरण उत्साहाचे झाले होते.

Bail Pola festival celebrated in the traditional manner.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *