शेकडो वर्षांच्या परंपरेला फाटा; भाविकांमध्ये तीव्र संताप
त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
शेकडो वर्षांच्या परंपरेला फाटा देत सोमवारी (दि. 5 ऑक्टोबर) त्र्यंबकराजाचे कुशावर्त घाटावरील स्नान बाहेरून बादलीने पाणी आणून करावे लागले. सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहणाचा अल्टिमेटम गाठण्यासाठी कुशावर्त घाट कोरडा करून बॅरिकेडिंंंग करून बंद केला आहे. परिणामी भाविकांना स्नानासाठी बंदी असून, कुंडातील संपूर्ण पाणी बाहेर काढून ते कोरडे करण्यात आले आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिराच्या 300 वर्षांच्या परंपरेनुसार प्रत्येक सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास भगवान त्र्यंबकेश्वराचा पंचमुखी सुवर्ण मुखवटा पालखीत ठेवून तो संस्थानी इतमामात स्नानासाठी कुशावर्त घाटावर आणला जातो. त्यानुसार सोमवारी पालखी सोहळा झाला. पालखीसाठी बॅरिकेडिंग बाजूला करण्यात आले. मात्र, कुशावर्तात पाणीच नसल्याने आणि तळाकडील पाणी अत्यंत खराब झाल्याने देवाच्या पूजेसाठी आणि स्नानासाठी बाजूच्या घरातील विहिरीवरून बादलीने पाणी मागवावे लागले.
सिंहस्थ कुंभमेळा तोंडावर आल्याने आता प्रशासनाला जाग आली आहे. गेल्या एक वर्षापासून रखडलेली राज्य पुरातत्त्व विभागाची कामे आता राष्ट्रपतींच्या दौर्याच्या पार्श्वभूमीवर रात्रीचा दिवस करून संथगतीने सुरू आहेत. कुशावर्ताचा भाग असलेली पिंडाची धर्मशाळा नागरिकांच्या दमादीविधीसाठी (दशक्रिया विधी) वापरली जाते; परंतु कामाच्या पसार्यामुळे आता तीही जागा उपलब्ध राहिलेली नाही कुशावर्त घाट पूर्णपणे बंद केल्यामुळे येथे येणार्या भाविकांच्या श्रद्धेवर थेट आघात झाला आहे. पालखी सोहळ्यादरम्यान भाविकांनी याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
प्रशासनाच्या या मनमानी कारभारामुळे हिंदू देवतांच्या परंपरा मोडीत काढल्या जात असल्याची भावना भाविकांकडून व्यक्त होत
आहे.
Bathing Lord Trimbak-raja with water from an external source at Kushavarta Ghat.
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः। यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः॥ भावार्थ : जिथे स्त्रीचा…
- मनीषा चौधरी चित्रपटसृष्टीत सध्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे तो म्हणजे, नितेश तिवारी दिग्दर्शित आणि…
- डॉ. किशोर पवार मानवी शरीरासाठी जीवनसत्त्वाचे महत्त्व किती अनन्यसाधारण आहे याची कल्पना सर्वांनाच आहे.…
- ज्योती काळे-जाधव अलीकडच्या काळात घडणार्या आत्महत्यांच्या घटना मनाला अस्वस्थ करून जातात. पुण्याची पायल, काल…
- प्रणाली देशमुख तसा खूप मोठा परिवार आहे यांचा! पिढ्यान्पिढ्या आपल्याला अगदी मनपसंद, चमचमीत, तिखट-गोड…
- वाहिद बागवान रस्ता कुठे जातो, हे सांगण्यासाठी उभारलेल्या दिशादर्शक कमानींवर आता कोणत्या नेत्याचा वाढदिवस…