नाशिक

दुकाने, गॅरेजवर मनपाचा हातोडा

डीजीपीनगरमधील सरकारी भूखंडावरील अतिक्रमण हटविले

सिडको : प्रतिनिधी
इंदिरानगर-वडाळा परिसरातील डीजीपीनगर क्रमांक 1 मधील सर्व्हे क्रमांक 49/50 येथील सरकारी भूखंडावर पुन्हा उभारण्यात आलेली अतिक्रमणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सोमवारी (दि. 5) हटवली. या कारवाईत गॅरेज, राहते घर आणि सर्व्हिस स्टेशनचे अतिक्रमण हटविण्यात आले.
याच ठिकाणी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये मोठी कारवाई करून सुमारे 36 दुकाने हटविण्यात आली होती. त्यानंतर सरकारी भूखंड अतिक्रमणमुक्त करण्यात आला होता. मात्र, काही व्यावसायिकांनी पुन्हा त्याच जागेवर अतिक्रमण करून दुकाने उभारल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे महापालिकेने पुन्हा कारवाई केली. महापालिकेच्या उपायुक्त (अतिक्रमण) सुवर्णा दखणे यांच्या आदेशानुसार आणि नाशिक पूर्व विभागीय अधिकारी आनंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अतिक्रमण विभागाचे लिपिक गुणवंत वाघ यांच्या उपस्थितीत पथकाने अतिक्रमणे हटविली. सरकारी भूखंडावर पुन्हा अतिक्रमणे झाल्याचा मुद्दा प्रभाग समितीच्या बैठकीत उपस्थित झाला होता. नगरसेविका संध्या कुलकर्णी यांनी महापालिका प्रशासनाला याबाबत जाब विचारत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर अतिक्रमण विभागाने कारवाईची मोहीम हाती घेतली. महापालिकेच्या नाशिक पूर्व अतिक्रमण पथकाचे समन्वयक सूर्यवंशी, पथक समन्वयक प्रभाकर अभंग यांच्यासह सुमारे 20 कर्मचारी तसेच एनडीएसचे जवान या कारवाईत सहभागी झाले होते. यापूर्वी कारवाई करून अतिक्रमणमुक्त केलेल्या सरकारी जागेवर पुन्हा अतिक्रमण झाल्याने महापालिकेने ही कारवाई केली. त्यामुळे भविष्यात या जागेवर पुन्हा अतिक्रमण होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून लक्ष ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे.

Municipal Corporation cracks down on shops and garages

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

आखिर कब तक चुप रहेगी?

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः। यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः॥ भावार्थ : जिथे स्त्रीचा…

7 hours ago

’रामायण’ची आधुनिक झेप

- मनीषा चौधरी चित्रपटसृष्टीत सध्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे तो म्हणजे, नितेश तिवारी दिग्दर्शित आणि…

7 hours ago

व्हिटॅमिन बी-12 च्या मदतीने केली नवी रिचार्जेबल बॅटरी

- डॉ. किशोर पवार मानवी शरीरासाठी जीवनसत्त्वाचे महत्त्व किती अनन्यसाधारण आहे याची कल्पना सर्वांनाच आहे.…

7 hours ago

आत्महत्या हा उपाय नाही…

- ज्योती काळे-जाधव अलीकडच्या काळात घडणार्‍या आत्महत्यांच्या घटना मनाला अस्वस्थ करून जातात. पुण्याची पायल, काल…

7 hours ago

दिवाळी संपली; फराळाच्या आठवणी कायम

- प्रणाली देशमुख तसा खूप मोठा परिवार आहे यांचा! पिढ्यान्पिढ्या आपल्याला अगदी मनपसंद, चमचमीत, तिखट-गोड…

7 hours ago

दिशादर्शकांवर ‘भाऊ-दादां’ची मक्तेदारी!

- वाहिद बागवान रस्ता कुठे जातो, हे सांगण्यासाठी उभारलेल्या दिशादर्शक कमानींवर आता कोणत्या नेत्याचा वाढदिवस…

7 hours ago