1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते…
व्यायाम करणारी व्यक्ती तुलनेने अधिक काळ जगते. कारण व्यायामामुळे शरीरातील वृद्धत्वाकडे जाणारी प्रक्रिया मंद होत असते. अशा व्यक्तींचे जीवन केवळ दीर्घच असते असे नव्हे, तर ते तुलनात्मकरीत्या वेदनांपासून मुक्त आणि अनेक प्रकारच्या पीडांपासून दूर असते.
2) नितळ त्वचा, चमकदार केस आणि निरोगी नखे…
व्यायाम करणार्यांच्या शरीरात रक्तप्रवाह वेगाने वाहत असतो आणि त्याचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम शरीरावर होतातच, पण ते त्वचा, केस आणि नखांवर प्रतिबिंबित होत असतात. नियमित व्यायाम करणार्यांचे केस भराभर वाढतात व त्याच्यावर उत्तम चकाकी असते. अशा व्यक्तींची त्वचा नितळ असते आणि नखांची वाढसुद्धा निरोगीपणे होत असते.
3) शरीरातील अवयवांचा एकमेकांशी उत्तम समन्वय साधला जातो…
आपल्या शरीरामध्ये मेंदू, हृदय, हात, पाय इत्यादी अनेक अवयवांची जोडी (दोन) असते- डावे आणि उजवे. त्यांच्यात जेवढा चांगला समन्वय असेल तेवढा जीवनाचा दर्जा चांगला असतो. नियमितपणे व्यायाम केल्याने डाव्या आणि उजव्यामध्ये चांगला समन्वय साधला जातो.
4) शरीराची कार्यक्षमता वाढते…
नियमितपणे व्यायाम करणार्यांच्या शरीरातील चयापचय क्रिया उत्तम चालत असते आणि त्यामुळेच त्यांची ऊर्जा पातळी चांगली असल्यामुळे त्यांच्यावर कामाचा कितीही भार पडला तरी तो त्यांना सहन होतो आणि ते उत्तम कार्यक्षमतेने काम करू शकतात.
5) मन सकारात्मक राहते…
व्यायाम करणार्यांची विचार करण्याची पद्धत सकारात्मक असते. त्यामुळे त्यांची उत्पादकताही चांगली असते. कमी ऊर्जेमध्ये आणि कमी वेळेत उत्तम काम करण्याची क्षमता त्यांच्यात विकसित झालेली असते. कोणत्याही गोष्टीचा आळस येत नाही. उत्साहवर्धक वाटते.
कंबरदुखी….
1. बाभळीची साल…
1.1 बाभळीची साल काढायची.
1.2 पाण्यात टाकून कडक उकळवा.
1.3 त्या पाण्याने गुडघे किंवा पाय दुखत असेल तिथून धुऊन टाका. 10 मिनिटांत फरक पडतो.
2. जवस…
2.1 रोज सकाळ-संध्याकाळी बडीशोपसारखे जेवण झाल्यावर जवस खा.
2.2 जवस शरीरातील वंगणसारखे काम करते. गुडघेदुखीला खूप फरक पडतो.
3. पांढरे तीळ... खात जा. हाडे मजबूत होतात.
4. एरंडेल तेल…
4.1 भाकरीचा गोळ्यात अर्धा चमचा एरंडेल तेल घाला.
4.2 त्याची भाकरी 15 दिवस रोज रात्री जेवताना खा.
4.3 पंधरा दिवस करा हे. याने गुडघेदुखी, कंबरदुखी बरी होते.
5 तिळाचे तेल…
5.1 गुडघे फारच दुखत असतील तर, तिळाचे तेल सकाळ- संध्याकाळ प्या.
5.2 त्यावर कोमट पाणी प्या.
5.3 पंधरा दिवसांत गुडघेदुखी थांबते.
Benefits of exercise and yoga
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…