‘माझी वसुंधरा 5.0’मध्ये 50 लाखांचे पारितोषिक, सलग दुसर्या वर्षी पारितोषिकावर मोहोर
सिन्नर : प्रतिनिधी
तालुक्यातील भोकणी ग्रामपंचायतीने ‘माझी वसुंधरा अभियान 5.0 ’मध्ये 1500 ते 2 हजार लोकसंख्येच्या गटात नाशिक विभागात प्रथम क्रमांक पटकावत 50 लाख रुपयांचे पारितोषिक मिळवले आहे. मागील वर्षी राज्यस्तरावर तृतीय क्रमांक मिळाल्यानंतर यंदा विभागात अव्वल झेप घेत गावाने सलग दुसर्या वर्षी मोठा सन्मान पटकावला.
‘माझी वसुंधरा’ अभियानाचा सन्मान सोहळा शनिवारी (दि. 21) मुंबई येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम येथे दुपारी 12 वाजता मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. महाराष्ट्र शासन यांच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत 1 जून 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीत अभियान राबविण्यात आले. हरितक्षेत्र वाढ, जलसंवर्धन, स्वच्छ ऊर्जा वापर, जैवविविधता संवर्धन आणि लोकसहभाग या पंचतत्त्वांवर आधारित निकषांवर स्थानिक स्वराज्य संस्थांचे मूल्यमापन करण्यात आले. सरपंच अरुण वाघ यांच्या नेतृत्वाखाली राबवलेल्या सातत्यपूर्ण पर्यावरणपूरक उपक्रमांमुळे ही कामगिरी साध्य झाली. मागील वर्षीच्या यशानंतरही उपक्रमांची गती कायम ठेवत ग्रामस्थ, अधिकारी, शिक्षक, आरोग्य कर्मचारी आणि स्वयंसेवक यांच्या सक्रिय सहभागामुळे गावाने उल्लेखनीय प्रगती साधली.
दरम्यान, शासन निर्णयानुसार पुरस्काराची रक्कम हरितक्षेत्र वाढविणे, जलसंधारण आणि पर्यावरणपूरक विकासकामांसाठी वापरण्यात येणार आहे. या उपक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ, गटविकास अधिकारी अशोक भवारी, सहाय्यक गटविकास अधिकारी विजय ढवळे, विस्तार अधिकारी नीलेश भुजाळ, ग्रामपंचायत अधिकारी योगेश रहाणे यांचेही सहकार्य लाभले.
यापूर्वी पटकावले विविध पुरस्कार
भोकणी ग्रामपंचायतीने यापूर्वी हागणदारीमुक्त गाव, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातील विविध पारितोषिके, अटल भूजल योजना जिल्हास्तरीय प्रथम पारितोषिक, तसेच ‘आर. आर. आबा स्वच्छ व सुंदर गाव’ स्पर्धेत तालुका व जिल्हास्तरावरील प्रथम क्रमांक पटकावला आहे. माझी वसुंधरा अभियानातील पुरस्कारामुळे ग्रामपंचायतीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
पर्यावरण बनले जीवनाचा भाग
हे केवळ पुरस्कारासाठी केलेले काम नाही. गावाने पर्यावरण हा दैनंदिन जीवनाचा भाग बनवला. वृक्षसंवर्धन पाणीबचत स्वच्छ ऊर्जा आणि लोकसभा या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित आहे. प्रत्येकाने जबाबदारी घेतली म्हणून हे यश मिळाले. हे यश एकट्याचे नसून, ते संपूर्ण ग्रामस्थांचे आहे.
– अरुण वाघ, सरपंच
- कुबेर जाधव केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला आहे. जाहीर करण्यात रिझल्टनुसार, एकूण बसलेल्या…
- अशोक थोरात गैरकारभार, घोटाळे, अफरातफर, लाच घेणार्यांसाठी सीबीआय, ईडी, लाचलुचपत प्रतिबंधकसह काही संस्था देशात…
- आनंदा जाधव काही दशकांपूर्वी राज्यातील बहुसंख्य जिल्ह्यांत साखर कारखानदारी बहरली होती. मुबलक उसामुळे अगदी…
- प्रशांत पोतदार काही गोष्टींचं कारण आपल्याला कधीच कळत नाही. कुणीतरी मनापासून हसतं आणि आपल्यालाही…
- गोरख काळे गरीब कुटुंबातील महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उदात्त हेतूने नाशिक महापालिकेच्या महिला व बालकल्याण…
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव, आनंदाची उधळण, नात्यांमधील गोडवा आणि नव्या आशांचा जागर. घराघरांत दिवे लागतात,…