नारळाच्या झाडानंतर आता बंगल्याच्या छतावर बिबट्यांची झुंज
सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नर तालुक्यातील सांगवी शिवारात नारळाच्या झाडावर झुंजणार्या बिबट्यांपैकी एक येथून जवळच दीड हजार फुटावर असलेल्या एका रिकाम्या बंगल्यावर दिसून आल्याने शेतकर्यांमध्ये दहशत पसरली आहे.
सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास विजय घुमरे यांच्या बंगल्यावर परिसरातील शेतकर्यांनी या बिबट्याला पाहिले द्राक्ष बागेच्या जवळ खोल वाट परिसरात बंगल्यावर मुक्त संचार करताना बिबट्या दिसून आला.
रविवारी सायंकाळी शरद घुमरे यांच्या शेतातील वडाच्या झाडावरून उतरतानाही एक बिबट्या शेतकर्यांनी पाहिला. या झाडावरून त्या झाडावर आणि चक्क शेतकर्यांच्या बंगल्यावरही बिबट्या चा वावर आढळून आल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत.
वनविभागाच्या कर्मचार्यांशी संपर्क साधला असता त्यांनी नारळाच्या झाडाजवळ लावण्यात आलेल्या दोन पिंजर्यांपैकी एक पिंजरा बंदोबस्तासाठी मंगळवारी सकाळी खोल वाट परिसरात लावण्यात येणार असल्याची माहिती दिली.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…