नाशिक शहरात खुनाचे सत्र सुरुच
सातपूर येथे भावाने केला भावाचा खून
सिडको : दिलीपराज सोनार
-सातपूर औद्योगिक वसाहतीलगत असलेल्या संतोषीमाता नगर परिसरातघरगुती वादातून सख्या भावाने धारदार हत्याराने वार करत खून केल्याची घटना घडली. करण शिंगाडे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्याचा भाऊ अर्जुन शिंगाडे याला ताब्यात घेतले आहे.. माहिती मिळताच सातपूर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. .या घटनेनंतर संतोषीमाता नगर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. नागरिकांमध्ये घबराट पसरली असून पोलिसांकडून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.तपासासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत नलावडे, क्राईम पी.आय. विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय निहालदे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय जगताप, पोलीस कॉन्स्टेबल राकेश रसाळ, सागर गुंजाळ व हवालदार विश्वास पाटील आदी सातपूर पोलीस घटनास्थळी तपास करत आहेत.
घटना सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद; दारू पिऊन का आलास, विचारल्याने राग निफाड तालुका : प्रतिनिधी दारू…
व्यापार्याचे दीड किलो सोन्यासह आठ लाख लंपास मनमाड : प्रतिनिधी मनमाड येथील डमरे कॉलनीत…
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सुस्त, ठेकेदार मस्त दिंडोरी ः प्रतिनिधी लखमापूर फाटा-वरखेडा रस्त्यावर मागील महिन्यात…
कारवाईत वाहनासह साडेचौदा लाखांचा मुद्देमाल जप्त मालेगाव : प्रतिनिधी राज्य उत्पादन शुल्क मालेगाव विभागाच्या पथकाने…
रस्त्याचाही बोजवारा, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष दिंडोरी ः प्रतिनिधी सुरगाणा तालुक्यातील ग्रामपंचायत रोंघाने पैकी जांभूळपाडा गावातील नागरिकांना…
मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सिडको : विशेष प्रतिनिधी फ्लॅट विक्रीच्या व्यवहारात 85 लाखांहून…