मंत्री भुजबळ यांची केंद्रीय गृहमंत्री शहा यांच्याकडे मागणी
लासलगाव : वार्ताहर
कांदा उत्पादक शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी कांद्याच्या बाजारभावाबाबत स्थिर व दीर्घकालीन धोरण निश्चित करण्यात यावे, अशी आग्रही मागणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शहा यांच्याकडे दिल्ली येथील बैठकीत केली.
नाफेड व एनसीसीएफमार्फत सुरू असलेली कांदा खरेदी थेट कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकर्यांकडून करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी लावून धरली.
केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत दिल्लीत झालेल्या या उच्चस्तरीय बैठकीला केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, शिवराजसिंह चौहान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह महायुतीचे शिष्टमंडळ उपस्थित होते. बैठकीत बोलताना मंत्री भुजबळ म्हणाले की, सध्या कांद्याचा उत्पादन खर्च प्रतिक्विंटल 1,500 रुपयांवर गेला आहे. मात्र, जानेवारी 2026 पासून बाजारात कांद्याला केवळ 1,000 रुपये, तर गेल्या महिन्यात अनेक बाजार समित्यांमध्ये 800 रुपयांपेक्षा कमी दर मिळाला. यामुळे शेतकर्यांमध्ये प्रचंड असंतोष
आहे. 26 मे 2026 पासून केंद्र सरकारने रब्बी कांदा 1,580 रुपये दराने खरेदी करण्याचा घेतलेला निर्णय सकारात्मक असला, तरी खरेदीचा लक्ष्यांक किमान 10 लाख मेट्रिक टनांपर्यंत वाढवणे
गरजेचे आहे.
Determine a long-term policy regarding onion prices
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…