– अनुराधा सोनवणे
विवाह आनंदाचा स्रोत की तणावाचा? खरा प्रश्न कदाचित हा आहे – तुम्ही एकमेकांसाठी लढत आहात की एकमेकांविरुद्ध? यशस्वी विवाह हा योगायोगाने घडत नाही. तो योग्य समज, योग्य निर्णय, योग्य पाया आणि एकाच दिशेने चालण्याच्या सजग प्रयत्नातून घडतो. वेळ आली आहे तणावपूर्ण नातेसंबंधांना यशस्वी नातेसंबंधांमध्ये रूपांतरित करण्याची आणि विवाहाला संघर्षाचे मैदान नव्हे, तर एक मजबूत, आनंदी आणि समृद्ध टीम बनविण्याची.
आजच्या काळात घटस्फोट, नात्यातील संघर्ष, मानसिक व भावनिक त्रास, व्यसनाधीनता, हिंसा, विश्वासघात आणि विसंगती यांसारख्या समस्या वाढताना दिसतात. अनेकजण यामागे वेगवेगळी कारणे शोधतात. परंतु, खोलवर पाहिले तर या सर्वांच्या मुळाशी अनेकदा एकच प्रश्न असतो – दोन व्यक्ती खरोखर एकाच दिशेने चालत आहेत का?
विवाह म्हणजे केवळ दोन व्यक्तींचे एकत्र येणे नाही. तो एक संघ आहे, एक भागीदारी आहे आणि एक सामूहिक जीवनप्रवास आहे. परंतु, कोणतीही चांगली टीम तयार करण्यासाठी प्रथम चांगले खेळाडू आवश्यक असतात. जो स्वतःला हाताळू शकत नाही, तो टीम कशी हाताळणार? स्वतःच्या भावना, विचार, प्रतिक्रिया आणि वर्तन यांचे व्यवस्थापन ज्याला करता येते, तोच विकसित व्यक्तिमत्त्वाचा माणूस असतो. स्वतःशी जोडलेला नसलेला माणूस दुसर्याशी खोलवर जोडला जाऊ शकत नाही. म्हणूनच विवाहापूर्वी जोडीदार शोधण्यापेक्षा
स्वतःला घडविणे अधिक महत्त्वाचे आहे.
विवाहाचा उद्देश आनंद शोधणे नसतो; तर आधीपासून असलेल्या आनंदात भर घालणे असतो. जो स्वतःसोबत आनंदी राहू शकत नाही, तो दुसर्यासोबतही खरा आनंद निर्माण करू शकत नाही. कारण आपण जे स्वतःकडे नाही, ते दुसर्याला देऊ शकत नाही. आनंदी नातेसंबंधांची सुरुवात आनंदी व्यक्तींपासून होते. म्हणून प्रथम स्वतःशी मैत्री करा, स्वतःला समजून घ्या आणि स्वतःच्या सहवासात आनंदी राहायला शिका. कोणत्याही यशस्वी टीमचा किंवा विवाहाचा सर्वांत महत्त्वाचा पाया म्हणजे मैत्री. दोन व्यक्ती, एक प्रवास, एक दिशा – तेव्हाच घडतो यशस्वी विवाह. खरे जोडीदार हे सर्वप्रथम मित्र असतात. असे मित्र ज्यांच्यासोबत आपण कोणतीही गोष्ट भीतीशिवाय, न्याय होण्याच्या भीतीशिवाय शेअर करू शकतो. हे फक्त तेव्हाच शक्य होते जेव्हा दोन व्यक्तींमध्ये खोलवर विश्वास आणि समज निर्माण झालेली असते. नात्यातील सर्वांत सुंदर भावना म्हणजे – दिवसाच्या शेवटी मला माझ्या जोडीदाराशी सर्व काही शेअर करायचे आहे, ही आतून निर्माण होणारी ओढ.
आणि तितकेच महत्त्वाचे म्हणजे – माझा जोडीदार माझ्या अनुभवांना समजून घेईल, त्यांचा आदर करेल आणि मला भावनिक आधार देईल, ही खात्री. तुम्ही तुमच्या जोडीदारासमोर तुमच्या कमकुवत बाजू, भीती, अपूर्णता आणि खर्या भावना दाखवू शकता का? तुम्ही तुमची ती नाजूक बाजू उघड करू शकता का, जी तुम्ही जगापासून लपवून ठेवता? आणि सर्वांत महत्त्वाचे – तुम्हाला खात्री आहे का की, तुमचा जोडीदार त्या नाजूकतेचा आदर करेल आणि तिचा गैरवापर करणार नाही? जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांच्या संरक्षणकर्त्या बनतात, तेव्हा ते फक्त पती-पत्नी राहत नाहीत; ते एकमेकांचे सुरक्षित आधार बनतात. हीच ती जागा आहे जिथे नाते भीतीवर नाही, तर विश्वासावर उभे राहते. हीच ती जागा आहे जिथे घर हे फक्त वास्तू नसून, डरषश केाश बनते. आणि अशा दोन व्यक्तींचे नातेच आपण विवाह म्हणतो.
विवाहाचा उद्देश आनंद शोधणे नसतो; तर आधीपासून असलेल्या आनंदात भर घालणे असतो. जो स्वतःसोबत आनंदी राहू शकत नाही, तो दुसर्यासोबतही खरा आनंद निर्माण करू शकत नाही. कारण आपण जे स्वतःकडे नाही, ते दुसर्याला देऊ शकत नाही. एकटे असताना आनंदी राहा. एकत्र असताना अधिक आनंदी व्हा. हाच निरोगी, संतुलित आणि यशस्वी विवाहाचा खरा पाया आहे. विवाह म्हणजे अपूर्णतेतून पूर्णता शोधण्याचा प्रयत्न नाही; तर दोन जागरूक, संतुलित आणि आनंदी व्यक्तींनी एकत्र येऊन अधिक सुंदर आणि अधिक समृद्ध जीवनप्रवास घडविण्याचा निर्णय आहे. खर्या अर्थाने मजबूत, आनंदी आणि यशस्वी टीम घडविण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन व्यक्तींमधील हृदयांची, विचारांची आणि मूल्यांची जोडणी. विवाहाचा उद्देश केवळ एकत्र राहणे नसून, एकमेकांना त्यांच्या सर्वात अस्सल,
सर्वोत्तम आणि विकसित रूपात फुलण्यास मदत करणे हा आहे. दोन व्यक्ती एकाच दिशेने जाण्यास तयार असतील तर अनेक संकटांवर मात करता येते.
Divorce: Failure in a Relationship
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…