नाशिक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आज

शहरात ‘निळे वादळ’ : झेंडे, पताका खरेदीला वेग

नाशिक : प्रतिनिधी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने बाजारपेठ सजली आहे. झेंडे, पताका, चमकी अशा विविध वस्तू बाजारात विक्रीस दाखल झाल्या आहेत. संपूर्ण बाजारपेठ निळ्या रंगाच्या वस्तूंनी उजळून निघाली आहे. झेंडे व बॅज यांची अधिक मागणी आहे.
आज, मंगळवारी (दि. 14) डॉ. आंबेडकर जयंती साजरी होणार आहे. सर्वत्र तयारीस वेग आला आहे. बाजारपेठेत झेंडे, मफलर, पट्टी, टोपी, फेटे अशा विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बाजारपेठ जयंतीसाठी लागणार्‍या साहित्याने उजळून निघाली आहे. ठिकठिकाणी वस्तू विक्रीची दुकाने लागली आहेत.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वस्तूंच्या दरात 10 टक्के वाढ झाली आहे. भद्रकाली मार्केट या ठिकाणी जयंतीसाठी लागणार्‍या साहित्याची बाजारपेठ मोठ्या प्रमाणावर आहे. शहर-जिल्ह्यातील सार्वजनिक मंडळे आणि तरुण हे साहित्य खरेदीसाठी भद्रकाली मार्केटमध्ये गर्दी करीत आहेत.
तरुणांकडून या वस्तू विशेषत: मोठमोठे झेंडे खरेदीकडे विशेष आकर्षण दिसत आहे. त्याचप्रमाणे जय भीम लिहिलेली रिबीन, कागदी, कापडी, प्लास्टिक पताका, आकाशकंदील, काठ्या यांचीही मागणी वाढली आहे.
लहान-मोठे झेंडे, डॉ. आंबेडकरांची प्रतिमा असलेले झेंडे यांना अधिक मागणी आहे. रस्ते, चौक आदी ठिकठिकाणी झेंडे, पताका, कमानी उभारण्यासह विविध तयारीस वेग आला आहे.

विविध कार्यक्रम

जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रम होणार आहेत. विविध मंडळे, राजकीय पक्ष यांनी कार्यक्रम आयोजित केले आहेत.

विविध साहित्याचे असे दर
साहित्य दर
स्टिकर -10 ते 20 रुपये
रिबीन – 30 रुपये बंडल
झेंडे – 20 ते 950
बॅज – 10 ते 40
पताका कागदी – 20 रुपये पाकीट
पताका कापडी – 40 रुपये पाकीट
पताका प्लास्टिक – 60 रुपये पाकीट
टोपी – 10 ते 40 रुपये
फेटा – 100 ते 550 रुपये
मफलर – 20 ते 70 रुपये
चमकी -150 रुपये बंडल
आकाशकंदील – 60 ते 450 रुपये
तोरण
शिका, संघटित व्हा! पडदा – 60 ते 250 रुपये
                                          10 फुटी ः 650 रुपये

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti today

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

3 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

3 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

3 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

3 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

4 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

4 hours ago