नाशिक

येवल्यात यंदाच्या दिवाळीवर दुष्काळाचे सावट

बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी ओसरली; शेतकरी अडचणीत, महागाईत मात्र वाढ

येवला : प्रतिनिधी
यंदाच्या वर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने येवला शहर व तालुक्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाने पाठ फिरवल्याने शेतातील पिके उद्ध्वस्त झाली असून, शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. याचा थेट परिणाम यंदाच्या दिवाळी सणावर आणि स्थानिक बाजारपेठेवर दिसून येत आहे
ऐरवी शेतकर्‍यांच्या खरेदीवर गजबजणारी येवल्याची बाजारपेठ यंदा पूर्णपणे मंदावली आहे. पावसाअभावी शेतकर्‍यांचे आर्थिक बजेट कोलमडल्यामुळे शहरात वस्तूंच्या खरेदीसाठी होणारी गर्दी नगण्य आहे. दिवाळी साजरी करायची म्हणून जेमतेम खरेदी केली जात असल्याने बाजारपेठेत शुकशुकाट पाहावयास मिळत आहे. दिवाळीनिमित्त शहरात आकाशकंदील, फराळाचे पदार्थ, कपडे आणि साड्यांची दुकाने थाटण्यात आली आहेत. मात्र, खरेदीसाठी शेतकरी किंवा शहरातील नागरिकांची अपेक्षित गर्दी दिसून येत नाही. एकंदरीत, पावसाची ओढ, पिकांचे झालेले नुकसान आणि गगनाला भिडलेली महागाई यांमुळे यंदा येवला शहराच्या बाजारपेठेवर दुष्काळाचे सावट स्पष्टपणे दिसून येत आहे.

किराणा साहित्याचे दर वाढले
एकीकडे दुष्काळी परिस्थिती तर दुसरीकडे भरमसाठ वाढलेली महागाई, यामुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. किराणा साहित्य, खाद्यतेल आणि साखरेच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

 

Drought casts a shadow over Diwali in Yeola this year

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्क्रीन, स्ट्रेस आणि सोशल मीडिया

जनरेशन झेड (Gen Z) च्या मानसिक आरोग्याची आव्हाने आणि उपाय हातात अत्याधुनिक स्मार्टफोन, डोळ्यांवर चकाकणारा…

6 hours ago

गोपालनाचे आणि गोरक्षणाचे महत्त्व सांगणारी ‘वसूबारस’

दीपावलीतील पाहिला सण ’वसूबारस’. आश्विन कृष्ण द्वादशीस हा सण साजरा केला जातो. या दिवशी गोधनाची…

7 hours ago

आली दिवाळी…

भारतीय संस्कृती आणि परंपरेतील दिवाळी हा सर्वार्ंत मोठा सण असून, हिंदूंच्या या सणाचे विविध धर्मांच्या…

7 hours ago

स्त्रीचे खरे सौंदर्य स्वावलंबनात आणि स्वतःची ओळख निर्माण करण्यात

हेमांगी पाटील : दै. गांवकरी नवरंगोत्सवाच्या विजेत्या महिलांचा गौरव नाशिक : प्रतिनिधी स्त्रीचे खरे सौंदर्य…

7 hours ago

भाजपचे स्वीकृतसाठी धक्कातंत्र; शिंदेसेनेचे नाशिकरोडला झुकते माप

नाराजी टाळण्यासाठी दोन्ही पक्षांत एक-एक वर्षाचे रोटेशन भाजपकडून संदीप लेनकर, अजित चव्हाण, हेमंत धात्रक, रोहिणी…

7 hours ago

नाशिककरांचा खरेदीचा उत्साह अन् वाहतूक कोंडीचा मनस्ताप

मुख्य बाजारपेठांसह उपनगरांत वाहतूक कोंडीचा विळखा नाशिक : प्रतिनिधी प्रकाशपर्व अर्थात, दिवाळी सणाला आजपासून (दि.…

8 hours ago