नाशिक

वाइन शॉप कर्मचार्‍याचा प्रेशर गनमधील खिळा छातीत घुसल्याने मृत्यू

सिडको : प्रतिनिधी
सिडकोतील स्टेट बँक चौक परिसरातील लिकर कट्टा वाइन शॉपमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍याचा प्रेशर गनमधील खिळा छातीत घुसल्याने मृत्यू झाला. सुनील अनिल तायडे (वय 39, रा. कामटवाडे) असे मृत कर्मचार्‍याचे नाव आहे. सोमवारी (दि. 2) सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने सुविधा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
या घटनेमुळे सिडको परिसरात खळबळ उडाली असून, तायडे यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वाइन शॉपमधील घटनेचे सीसीटीव्ही चित्रण समाजमाध्यमांवर प्रसारित झाले आहे. त्यामध्ये एका व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद असल्याची चर्चा सुरू झाल्याने हा प्रकार अपघात आहे की घातपात, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
दरम्यान, अंबड पोलीस ठाण्यात या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून सीसीटीव्ही चित्रण ताब्यात घेण्यासह त्याची तपासणी सुरू केली आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या व्यक्तींची चौकशी केली जात आहे. प्रेशर गनमधील खिळा तायडे यांच्या छातीत नेमका कोणत्या परिस्थितीत घुसला, याचा तपास पोलीस करीत आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतरच मृत्यूमागील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. मृत तायडे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने कामटवाडे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सीसीटीव्ही चित्रणातून उलगडणार मृत्यूचे गूढ?

सुनील तायडे यांच्या मृत्यूनंतर वाइन शॉपमधील सीसीटीव्ही चित्रण चर्चेचा विषय ठरले आहे. चित्रणातील एका व्यक्तीच्या हालचालींवरून संशय व्यक्त केला जात असला, तरी त्यातून घातपाताचा निष्कर्ष काढता येणार नाही. प्रेशर गनमधील खिळा हृदयापर्यंत कसा पोहोचला, त्यावेळी नेमके काय घडले आणि या घटनेला कोण जबाबदार आहे, या प्रश्नांची उत्तरे पोलिसांच्या तपासातून मिळणार आहेत. त्यामुळे सीसीटीव्ही चित्रण आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब महत्त्वाचे ठरणार आहेत. अपघात की घातपात, याबाबत अद्याप पोलिसांनी अधिकृत निष्कर्ष जाहीर केलेला नाही.

 

Wine shop employee dies after a nail from a pressure gun pierces his chest

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्क्रीन, स्ट्रेस आणि सोशल मीडिया

जनरेशन झेड (Gen Z) च्या मानसिक आरोग्याची आव्हाने आणि उपाय हातात अत्याधुनिक स्मार्टफोन, डोळ्यांवर चकाकणारा…

6 hours ago

गोपालनाचे आणि गोरक्षणाचे महत्त्व सांगणारी ‘वसूबारस’

दीपावलीतील पाहिला सण ’वसूबारस’. आश्विन कृष्ण द्वादशीस हा सण साजरा केला जातो. या दिवशी गोधनाची…

6 hours ago

आली दिवाळी…

भारतीय संस्कृती आणि परंपरेतील दिवाळी हा सर्वार्ंत मोठा सण असून, हिंदूंच्या या सणाचे विविध धर्मांच्या…

6 hours ago

स्त्रीचे खरे सौंदर्य स्वावलंबनात आणि स्वतःची ओळख निर्माण करण्यात

हेमांगी पाटील : दै. गांवकरी नवरंगोत्सवाच्या विजेत्या महिलांचा गौरव नाशिक : प्रतिनिधी स्त्रीचे खरे सौंदर्य…

6 hours ago

भाजपचे स्वीकृतसाठी धक्कातंत्र; शिंदेसेनेचे नाशिकरोडला झुकते माप

नाराजी टाळण्यासाठी दोन्ही पक्षांत एक-एक वर्षाचे रोटेशन भाजपकडून संदीप लेनकर, अजित चव्हाण, हेमंत धात्रक, रोहिणी…

7 hours ago

नाशिककरांचा खरेदीचा उत्साह अन् वाहतूक कोंडीचा मनस्ताप

मुख्य बाजारपेठांसह उपनगरांत वाहतूक कोंडीचा विळखा नाशिक : प्रतिनिधी प्रकाशपर्व अर्थात, दिवाळी सणाला आजपासून (दि.…

7 hours ago