सिडको : विशेष प्रतिनिधी
नाशिकमधील पंचवटी परिसरात पानस्टॉल चालकाकडून खंडणी उकळल्याचा प्रकार समोर आला असून, या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील फिर्यादी कैलास रत्नाकर ढोरे (वय 51, व्यवसाय पान दुकान, रा. सुनंदा हाइट्स, काठे गल्ली, द्वारका, नाशिक) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते दिंडोरी नाका परिसरातील वात्सल्य चहाच्या दुकानाशेजारी असलेल्या आपल्या पानस्टॉलवर काम करत होते.
यावेळी विकास हेमके नावाचा इसम पानस्टॉलवर आला. त्याने फिर्यादीला धमकावत तू मला ओळखत नाही का, मी पंचवटीचा भाई असून, खून आणि दरोडे केले आहेत, असे सांगत शिवीगाळ केली. तसेच दर महिन्याला हप्ता द्यावा लागेल, नाहीतर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली. यानंतर आरोपीने पान स्टॉलवरील काउंटरमधील गल्ल्यात बळजबरीने हात घालून पाच हजार रुपये रोख रक्कम काढून घेतली. पुढे वेळेवर खंडणी दिली नाही तर दुकान चालू देणार नाही व जिवे ठार मारीन, अशी धमकी देत तो मोटारसायकलवरून पळून गेल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुनील पवार (गुन्हे), सहायक पोलीस निरीक्षक शिरसाठ व सहायक पोलीस निरीक्षक पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पंचवटी पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
- कुबेर जाधव केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला आहे. जाहीर करण्यात रिझल्टनुसार, एकूण बसलेल्या…
- अशोक थोरात गैरकारभार, घोटाळे, अफरातफर, लाच घेणार्यांसाठी सीबीआय, ईडी, लाचलुचपत प्रतिबंधकसह काही संस्था देशात…
- आनंदा जाधव काही दशकांपूर्वी राज्यातील बहुसंख्य जिल्ह्यांत साखर कारखानदारी बहरली होती. मुबलक उसामुळे अगदी…
- प्रशांत पोतदार काही गोष्टींचं कारण आपल्याला कधीच कळत नाही. कुणीतरी मनापासून हसतं आणि आपल्यालाही…
- गोरख काळे गरीब कुटुंबातील महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उदात्त हेतूने नाशिक महापालिकेच्या महिला व बालकल्याण…
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव, आनंदाची उधळण, नात्यांमधील गोडवा आणि नव्या आशांचा जागर. घराघरांत दिवे लागतात,…