संपादकीय

प्रसिद्धिपराङ्मुख रंगनाथ पठारे

आपल्या बहुविध लेखणीने वाचकांच्या मनावर गारुड निर्माण करणारे प्रसिद्धिपराङ्मुख लेखक रंगनाथ पठारे यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस. त्यानिमित्त..
खूपच दिवसांपूर्वीची गोष्ट आहे, रंगनाथ पठारे यांचे ताम्रपट पुस्तक वाचले. त्यापूर्वी आकाराने छोटे छोटे (बारके बारके) पुस्तके वाचण्याची सवय. ‘ताम्रपट’ मात्र आकाराने, विस्ताराने मोठेच. विविध सामाजिक, राजकीय चळवळीची तोंडओळख होण्याची ती माझी सुरुवातच होती. त्यामुळेच या पुस्तकातील अनेक व्यक्तींनी खूप दिवस मनात घर केले. त्यातून पुढे त्यांनी अनेक विषयांवर लिहिले. शक्यतो सर्वच पुस्तके वाचली. बर्‍यापैकी आवडली तर काही वाचून डोक्यात गुंता करून गेली. उदाहरणार्थ सात पाटील कुलवृत्तांत अगदी उंच डोंगर चढताना दम लागावा तसं वाटलं खरं; पण टोकावर गेल्यावर नजर विस्तारली. सरव बाजूने परिसर दिसू लागला. आत्ताच्या एक रंगी समाज बनविण्याच्या प्रयत्नात सात पाटील बरोबर मध्ये उभे आहेत. जगभरातून अनेकांनी भर टाकून बनविलेली आपली संस्कृती आहे. आजचं दिसणारं तिचं स्वरूप विविध रंगांनी रंगलेलं आहे. त्याचं कारणही या पुस्तकाने वाचकांना स्पष्ट केलं तर असो. त्यांच्या लेखनाचं मूल्यमापन करणे माझा प्रांत नाही. एक वाचक म्हणून लक्ष वेधून घेणारा हा लेखक आहे, इतकंच!
तर अशा लेखकास प्रत्यक्ष भेटून मनातील काही शंका विचाराव्यात म्हणून माझे मित्र कैलासवासी शंकर बोराडे यांना ही इच्छा पूर्ण करावी म्हणून गळ घातली. त्यांनी जायच्या अगोदर स्पष्ट केलं, आपण थेट घरी संगमनेरला जाऊ, मात्र भेटले नाही किंवा भेट नाकारली तर बिलकूल वाईट वाटून घेऊ नको. धोक्याची सूचना मिळाली तरी आम्ही एके दिवशी त्यांच्या दारात जाऊन उभे राहिलो. भेट झाली. भरपूर गप्पा केल्या. माझ्या मनातील साहित्यविषयक काही प्रश्नांनाही त्यांनी उत्तरे दिली. नंतर काही दिवसांनी माझे पळसे गावी ते विनंती केल्यानुसार आले. अगदी मोजक्या 15 ते 20 माणसांसमोर छोटेखानी मनोगतही व्यक्तकेले. नंतर दिल्ली येथे साहित्य अकादमीच्या कार्यालयात योगायोगाने भेटले. नाशिकमध्ये कार्यक्रमात जात असे. मला तर त्यांचे भाषण ऐकण्यापेक्षा लिहिलेलेच मस्तच वाटते. खरंतर त्यांच्याबाबत अनेक प्रवाद आहे. हा प्रत्येकाच्या अनुभवाचा भाग असू शकेल. स्वभावाने काटेकोर. साहित्य संवेदनासारख्या उत्सवी आयोजनाच्या प्रकाराबद्दल टीकाकार असं बरंच काही असलं तरी एक दर्जेदार लेखक म्हणून त्यांचे मराठी भाषेतील स्थान कोणीही नाकारू शकत नाही.
मला कल्पना आहे की, त्यांना त्यांच्याबदल स्तुतीपर बोलणे व लिहिणेही आवडणार नाही किंवा त्यांना आपण काही सूचना करणे योग्य ठरणार नाही. परंतु समस्त मराठी भाषेच्या वाचकांच्या दृष्टीने रंगनाथ पठारे यांना मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होणे व पाहणे आपणा सर्वांना आवडेल. त्याकरिता आम्ही सर्वसामान्य वाचक म्हणून त्यांची परवानगी न घेता या कामाची सुरुवात करीत आहोत. इतका ताकदीचा उत्तम मराठी लिहिणारा माणूस यावर्षीच्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष व्हावा याकरिता प्रयत्न तर करू या! आपणा सर्वांच्या वतीने आरोग्याकरिता त्यांना उत्तम शुभेच्छा! मराठी माणसांना उत्तम पुस्तकांची त्यांच्याकडून अपेक्षा आहे.

– विष्णुपंत गायखे
अध्यक्ष, सार्वजनिक वाचनालय, पळसे 9373191358

Famous Ranganath Pathare

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

4 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

4 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

5 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

5 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

5 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

5 hours ago