संपादकीय

डोसा आणि माझी फजिती

आज आमच्या कूकने दांडी मारली.पोटापाण्याच्या विवंचनेत सगळे होते. तेवढ्यात आमच्या नातवाने डोसा खाऊ या! असा फतवा काढला आणि आम्ही जरासे चपापलोच. खरंतर माझी आणि दोशाची खूपच जास्त घनिष्ठता आहे. तुम्ही कोणत्याही भारतीयाला नाश्त्याच्या प्रसिद्ध पदार्थाचे नाव विचारा आणि तुम्हाला डोसा कोणत्याही यादीत सर्वांत वरती सापडेल. डोसा, डोसे डोसाई किंवा डोसा अशा विविध नावांनी ओळखले जाणारे हा पदार्थ दक्षिण भारतात सकाळी खाण्याची एक सर्वमान्य पहिली पसंती आहे, जे त्याच्या आंबलेल्या तांदूळ आणि उडीद पीठातून कार्ब्स आणि प्रथिनांचे संतुलन देते. ते इतके लोकप्रिय झाले आहे की, त्याचा स्वतःचा दिवसदेखील आहे आणि दरवर्षी 3 मार्च हा दिवस या स्वादिष्ट पदार्थाला समर्पित असतो. माझं आणि डोशाचं नातं हे काही साधंसुधं नाही. ते अगदी पहिल्या भेटीतच गैरसमज या प्रकारातलं आहे. खरंतर मी मनानं पारंपरिक – पोहे, उपमा, थालीपीठ या मराठमोळ्या पदार्थांत रमणारा. आणि डोसा म्हणजे थेट दक्षिणेचा रुबाबदार प्रतिनिधी! पण एक दिवस माझ्या मित्राच्या काकांसोबत (पुण्याचे) आग्रहाखातर मी त्यांच्यासोबत पहिल्यानेच जळगावच्या मद्रास कॅफेत गेलो.काय घेणार? या प्रश्नाला माझ्याजवळ उत्तर नव्हते. कारण रेस्टॅारंटमध्ये भजी, सामोसा, वडा व मिसळच मिळते, असा माझा तोपर्यंत समज होता. साहजिकच मी संभ्रमात होतो. बाकी काय घेताय याची वाट पाहत बसलो. माझ्या मित्राने व त्याच्या पुण्याच्या काकांनी डोशाची फर्माइश सांगितली. मी ते नाव ऐकून अचंबितपणे हा नेमका काय प्रकार आहे, याची उत्सकतेने वाट पाहत बसलो. आणि मग काय तर मग या कुरकुरीत महाशयाला सामोरं गेलो आणि तेव्हाच माझ्या फजितीचा सुवर्णअध्याय ही सुरू झाला.
घडलं असं की, आम्ही पुण्यात प्रसिद्ध  Vaishali  येथे दाखल झालो. तिथे वातावरणच वेगळं! प्रत्येक टेबलावर डोशांचे डोंगर, सांबाराच्या वाट्या आणि नारळाच्या चटणीची शुभ्र चादर. लोक इतक्या तंत्राने डोसा खात होते की वाटावं जणू डोसा व्यवस्थापन या विषयात त्यांनी पदवी घेतली आहे. मीही आत्मविश्वासाचा आव आणत म्हणालो, एक पेपर मसाला डोसा!
मित्रांनी कटाक्ष टाकला – साधा घेतला असतास तरी चाललं असतं
पण माझा उत्साह मात्र डोंगराएवढा! थोड्याच वेळात वेटर एक मोठ्ठा ट्रे घेऊन आला. त्यावर जो डोसा होता, तो पाहून माझ्या डोळ्यांत पाणीच आलं! एवढा मोठा की, मला वाटलं हा पदार्थ नाही, तर एखादी वास्तुशिल्पाची कलाकृती आहे. प्लेट लहान आणि डोसा मोठा – जणू घरातला गालिचा चुकून ताटात ठेवला आहे! मी काटा-चमचा उचलला. आणि डाव्या हातात काटा की चमचा या नेहमीच्या संभ्रमात पडलो. शेवटी चोरट्या नजरेने आजूबाजूस कटाक्ष टाकला आणि माझेच मला उत्तर मिळाले. पण डोसा एवढा नाजूक आणि लांबलचक होता की तो हातातून निसटत होता. मी एक टोक पकडलं तर दुसरं टोक सांबारात बुडालं. सांबार उडालं आणि शर्टवर सुंदर नकाशा तयार झाला. शेजारच्या टेबलवर बसलेल्या काकूंनी माझ्याकडे असा कटाक्ष टाकला, जणू मी त्यांच्या घरचं सांबार उधळलं आहे! सोबत आलेले मात्र दया दाखवण्याऐवजी हसून लोटपोट झाले होते.
एक म्हणाला, अरे आधी तो फोल्ड कर!
मी विचारलं, हा डोसा आहे की लग्नाची साडी? कुठून फोल्ड करू?
मी कसाबसा एक तुकडा मोडला. पण तो इतका मोठा निघाला की तोंडात बसवताना माझ्या चेहर्‍याचे विचित्र हावभाव झाले. ते पाहून समोरच्या मुलाने आईला विचारलं, आई, काका का रडताहेत? आईने शांतपणे उत्तर दिलं, बाळा, काका पहिल्यांदाच डोसा खाताहेत बहुतेक! सांबारात बुडवताना मी जरा जास्तच पुढे झुकलो आणि वाटी हलली. थोडंसं सांबार टेबलावर, थोडंसं पॅन्टवर आणि उरलेलं मनात! त्या क्षणी मला जाणवलं – डोसा खाणं ही केवळ भूक भागवण्याची क्रिया नसून, ती एक परफॉर्मन्स आहे. आणि मी त्यात नापास झालो होतो. शेवटी कसाबसा अर्धा डोसा संपवला. उरलेला भाग मात्र माझ्याकडे बघत म्हणत होता, मित्रा, आपलं जमत नाही! मीही नम्रपणे हात जोडले. त्या दिवसानंतर मी एक शहाणपण शिकलो – डोसा कितीही कुरकुरीत असो, आत्मविश्वास जरा जास्तच कुरकुरीत नको! आता जेव्हा कधी डोसा समोर येतो, तेव्हा मी आधी त्याच्याकडे आदराने पाहतो, मग हळूच विचारतो – आज फजिती करणार नाहीस ना? आणि मग साधा मसाला डोसा मागवतो, पेपर नाही!
कारण अनुभवाने मला शिकवलं आहे की – डोसा हा फक्त पदार्थ नाही, तो एक अनुभव आहे! बाहेरून कुरकुरीत, आतून मऊ, आणि सोबत सांबार-चटणीची फौज – म्हणजे अगदी राजेशाही थाट! डोसा आणि सांबार यांची जोडी म्हणजे जणू मैत्रीची मिसळ. नारळाची पांढरी शुभ्र चटणी बाजूला असली की रंगसंगती पूर्ण होते. पहिला घास घेतल्यावर जो आवाज येतो – कुर्रर्र! तोच डोशाचा खरा आनंद. म्हणूनच डोसा हा फक्त नाश्ता नाही, तो कुरकुरीत आनंदाचा उत्सव वाटतो.

Dosa and my fajitas

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

5 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

5 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

5 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

5 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

6 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

6 hours ago