नाशिक

जानोरीत 22 ऑगस्ट 2027 ला ध्वजारोहण,पर्वणी स्नान

आगामी कुंभमेळ्यानिमित्त साधू-संतांच्या उपस्थितीत शाहीस्नानासाठी बैठक

दिंडोरी : प्रतिनिधी
आगामी कुंभमेळापूर्व जानोरी येथे कुंभमेळा बैठक झाली. बैठकीत 22 ऑगस्ट 2027 ला जानोरी बाणगंगा नदीवर सर्व साधू -संतांच्या उपस्थितीत ध्वजारोहण व कुंभपर्वणी स्नान करण्याचे ठरवले गेले आहे.
जानोरी गाव नाशिक कुंभमेळा येथील चारपैकी एक चौकी असून, येथे कुंभमेळ्याची एक पर्वणी होत होती. कुंभमेळ्यापूर्वी तेव्हा साधू-महंत हे पायी, घोडेस्वारी, बैलगाडीने येत असत आणि ज्या ठिकाणी कुंभमेळा होतो. त्याच्या 10 ते 15 किमी अंतरावर सर्व साधू एकत्रित होण्यासाठी थांबत असत. त्याप्रमाणे पूर्वीपासून जानोरी येथे कुंभमेळ्याची पार्श्वभूमी आहे. जानोरी येथे श्रीरामांनी बाण मारून तयार झालेली बाणगंगा नदी गावाच्या बाजूने वाहते. तेथे साधू-महंत स्नान करणार असून, ध्वजारोहण होणार आहे. येथे सीता स्वयंवराचे प्रभू श्रीरामांचे मंदिर आहे. मागील 2015 मध्ये झालेल्या कुंभमेळ्यात एक पर्वणी झाली होती. जानोरी येथे 22 ऑगस्ट 2027 ला होणार्‍या या शाहीस्नानाची बैठक जानोरी येथे झाली. बैठकीला मार्गदर्शन करताना डॉ. भक्तीचरणदास महाराज यांनी सांगितले की, प्रयागराजच्या धर्तीवर नाशिक येथे कुंभमेळा होणार असून, एक पर्वणी जानोरी येथे होणार आहे. त्यासाठी सर्व आखाड्यांचे प्रमुख महंत या पर्वणीला येणार आहेत. यासाठी लागणारा सर्व खर्च प्रशासनाने करावा, यासाठी आम्ही कुंभमेळामंत्री गिरीश महाजन व संबंधित आयुक्त शेखरसिंग, जिल्हा परिषद अधिकार्‍यांशी पत्रव्यवहार करणार आहोत.
दुसरे महंत डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर यांनी सांगितले की, जानोरी गाव हे कुंभमेळा पार्श्वभूमीवर महत्त्वाचे गाव असून, नाशिक येथील पर्वणीप्रमाणे जानोरी येथील शाहीस्नान महत्त्वाचे आहे. परिसरातील भाविक पर्वणीच्या दिवशी येथे जमणार असून, सुमारे 40 ते 50 हजार लोक उपस्थित राहतील. येथील विकासकामांसह घाट दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध होणार आहे.
या बैठकीला डॉ. भक्तीचरणदास महाराज, डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष योगेश तिडके, सरपंच सुभाष नेहरे, ग्रामविकास अधिकारी नानाभाऊ खांडेकर, ग्रामस्थ सुनील घुमरे, ग्रामपंचायत सदस्य विलास काठे, गणेश विधाते, डी. बी. काठे, ज्ञानेश्वर डवणे, सुरेश घुमरे, निवृत्ती काठे, निवृत्ती घुमरे, देवीदास विधाते, पंडित वाघ, ज्ञानेश्वर काठे, बाळू शास्त्री विधाते, सोपान रहाणे, अरुण घुमरे, सोनू काठे, सोमनाथ वतार, सिद्धांत विधाते, रोशन महाराज विधाते, माधव घुमरे, सुरेश घुमरे, राजू रहाणे, संतोष विधाते आदी मान्यवर
उपस्थित होते.

Flag hoisting and bathing in Janori on 22 August 2027

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

…आणि मी प्रेमात पडतो!

- प्रशांत पोतदार काही गोष्टींचं कारण आपल्याला कधीच कळत नाही. कुणीतरी मनापासून हसतं आणि आपल्यालाही…

5 minutes ago

समाजकल्याण की कोटकल्याण?

- गोरख काळे गरीब कुटुंबातील महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उदात्त हेतूने नाशिक महापालिकेच्या महिला व बालकल्याण…

11 minutes ago

दिवाळीचा आनंद प्रत्येक घटकापर्यंत पोहोचू द्या!

दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव, आनंदाची उधळण, नात्यांमधील गोडवा आणि नव्या आशांचा जागर. घराघरांत दिवे लागतात,…

24 minutes ago

रखडलेला व्यापार करार

अमेरिकेचे विदेशमंत्री मार्को रुबियो 20 ते 22 ऑक्टोबर 2026 या कालावधीत भारत भेटीवर होते. त्यांच्या…

32 minutes ago

सप्तशृंगगडावर छबीना उत्सव साजरा

कावडधारक व तृतीयपंथीयांच्या उपस्थितीने गड दुमदुमला सप्तशृंगगड : प्रतिनिधी दसर्‍याला नवरात्रोत्सवाची सांगता झाल्यानंतर सप्तशृंगगडावर काल…

42 minutes ago

गोदाघाटावर शंखनादाचा विश्वविक्रम

नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पवित्र गोदाघाटावर रविवारी (दि. 25) 517 वादकांनी एकाच वेळी सामूहिक शंखनाद…

49 minutes ago