तरुण

मुले परदेशात

– पुष्पा गोटखिंडीकर

किती स्वार्थी, संकुचित वृत्तीचे असतो ना आपण मुलांचे पालक! केवळ स्वतः पुरता विचार करणारे सेल्फ सेंटर्ड. मुलगा/मुलगी परदेशात गेले, आता आमचे कसे होणार? म्हातारपणी आमची काळजी कोण घेईल, दुखलं-खुपलं कोण बघेल? असे एक ना अनेक प्रश्न आपल्या पालक वर्गामध्ये निर्माण होतात. सुरुवातीला मुलांना परदेशात पाठवताना आम्हा उभयतांच्या मनातही हे प्रश्न होतेच, पण ज्या आई-वडिलांनी मुलांना पंखात बळ दिले, आकाशात भरारी मारण्याचे सामर्थ्य दिले, लाथ मारतील तिथे पाणी काढतील अशा आत्मविश्वासानं आपल्या पाल्यांना परदेशी जाण्याची अनुमती दिली. अशा पालकांनी आपल्या पाल्यांचं परदेशगमन हे आनंदाने स्वीकारलेलं असलं पाहिजे.
मुलगा परदेशात गेला, की आपल्याला एकटं-एकटं वाटतं, आपल्याला इथे इतर नातेवाईक मंडळी, आप्तेष्ट शेजारीपाजारी, मित्र-मैत्रिणी असतात. आपला सुमारे 22 ते 25 वर्षाचा पाल्य विमानप्रवास करून अगदी एकट्यानं परक्या भूमीत जातो. ना ओळख, ना पाळख, ना आपली भाषा, ना कुणी नातेवाईक किंवा आप्तजन नाहीत. त्याला स्वतःचे निर्णय स्वतःच घ्यायचे आहेत आपला मार्ग आपल्यालाच शोधायचाय, स्वतःचं निवासस्थान शोधण्यापासून सर्व बाबी लक्षात घ्यावयाच्या आहेत.
आपल्याला आपल्या या वयातही आपल्या पाठीशी असणारी, माणसं इथ्ं असतात. तिथे त्यांच्या पाठीशी कोण असते?
आपल्या खाण्याच्या सवयी, आवडी-निवडीला मुरड घालतात. आपल्या जबरदस्त इच्छाशक्तीच्या बळावर परक्या भूमीत घट्ट पाय रोवतात. परदेशातही आपल्या संस्कृतीचा विसर पडू न देणारी मुलं आहेत. परदेशातही आपल्या स्वदेशाबद्दल अभिमान बाळगून स्वतंत्र मंडळ स्थापन करणारी मुले आहेत. अधूनमधून एकत्र येऊन ती मुले आपले सण-समारंभ, स्वातंत्र्यदिन, सांस्कृतिक कार्यक्रम अतिशय उत्साहाने साजरे करतात. आपल्या परंपरांचं जतन ते तेथेही करतात. आपली भारतीय संस्कृती साता समुद्रापार पोहोचवतात यातच त्यांचं सारं मोठेपण आहे. हे आम्ही परदेश प्रवासात अनुभवलेलं आहे.
आज संगणकाचं युग आहे, जग जवळ आलं आहे. मोबाईल वेबकॅम, माईक, स्पीकर, ब्रॉडबॅण्ड कनेक्शन, इंटरनेट, व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम इत्यादी सुविधा आहेत. आपले पाल्य या स्पर्धेत यशस्वी होऊन पुढे जात आहेत.
ज्या पालकांनी आपल्या पाल्याला स्वबळावर उत्तुंग झेप घेण्याची प्रेरणा आणि संस्कार दिलेले आहेत, ते पालक आपली म्हातारपणाची काठी गेली असं असहाय्यपणे कधीही म्हणणार नाहीत. आपले पाल्य आपला आदर राखून स्वतंत्र वृत्तीने जगू इच्छित आहेत, तर मग आपल्या अनुभवाचा फायदा आपण समाजाला देऊ शकतो. आपण त्यांच्या मदतीला धाऊन गेलो, तर आपल्याच असं लक्षात येईल, की आम्ही एकटे नाही, एकाकी तर मुळीच नाही. हे विश्वची माझे घर. देणार्‍याचे हात हजारो दुबळी माझी झोळी.

Friendship: A Priceless Bond

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

मोगरा फुलला

- प्रणाली देशमुख ए ऐक ना! बघ मी काय आणलंय, पळसाच्या पानाला बांधलेला धागा उकलत…

9 hours ago

समावेशित शिक्षणातून दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासाची नवी दिशा

- विजया अवचार प्रत्येक मुलाच्या डोळ्यांत एक स्वप्न असते-शिकण्याचे, घडण्याचे आणि आयुष्यात स्वावलंबी होण्याचे. काही…

9 hours ago

रस्त्यांची चाळण, नागरिकांचे हाल

- जगन घाणेकर  यंदाचा पावसाळा सुरू होण्यास विलंब झाला असला तरी जेव्हापासून त्याचे आगमन झाले…

9 hours ago

बंडाळी चव्हाट्यावर!

तीन राज्यांतील प्रत्येकी एका विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकांच्या निकालांची चर्चा सर्वत्र होत आहे. भाजपाला दोन…

9 hours ago

जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँकेकडून कर्जावरील व्याजदरात अर्धा टक्का कपात

नीलेश देशमुख : ऑगस्ट 2026 पासून निर्णय लागू; चार हजार कर्जदारांना लाभ नाशिक : प्रतिनिधी…

10 hours ago

वैद्यकीय सुविधेचा स्थायी सदस्यांकडून पंचनामा

समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र बैठक : सभापती सानप नाशिक : प्रतिनिधी शहरातील महापालिकेच्या बिटको रुग्णालयासह डॉ.…

10 hours ago