ग्राहकांंची चांदी, आगामी लग्नसराई आणि गुंतवणुकीसाठी संधी
नाशिक : प्रतिनिधी
दीपोत्सवाचा उत्सव संपताच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सुवर्ण बाजारात मोठी घडामोड पाहायला मिळत आहे. ऐन दिवाळीत दीड लाखापर्यंत पोहोचलेले दर आता चांगलेच खाली आले आहेत. दिवाळी संपताच सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचे दिसले. काल (दि. 13) प्रति दहा ग्रॅम सोन्याचे दर (24 कॅरेट) एक लाख 40 हजार 600 आणि 22 कॅरेटचे एक लाख 24 हजार 400 रुपये, तर चांदी एक लाख 84 हजार रुपये प्रतिकिलो, असे दर नोंदविण्यात आले.
दिवाळीतील धनत्रयोदशी आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दिवाळी पाडव्याला आर्वजून सोने-चांदी खरेदी केली जाते. जानेवारीत एक लाख 85 हजारांपर्यंत प्रति दहा गॅ्रम असलेले सोने गेल्या महिनाभरापासून दीड लाख ते एक लाख 48 हजारांपर्यंत दर खाली आल्याने ग्राहकांनी लग्न, सण, तसेच गुंतवणुकीस प्राधान्य देत खरेदी केली. ग्राहकांना आगामी काळात सोन्याचे दर पुन्हा एक लाख 85 ते दोन लाखांपर्यंत जाण्याच्या शक्यतेमुळे सोने गुंतवणुकीत चांगला परतावा मिळेल, या अंदाजाने सोने खरेदी केली होती. सोने दरातील चढउतार हे आंतरराष्ट्रीय घडामोडी, शेअर बाजार यावर अवलंबून असल्याकारणाने होत असतात.
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेकडून आगामी काळात व्याजदरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. व्याजदर वाढल्यास डॉलर मजबूत होतो आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्यावर दबाव येतो. प्रत्यक्ष सोने खरेदी करण्याऐवजी गुंतवणूकदारांचा ओढा गोल्ड बॉण्ड आणि सरकारी रोख्यांकडे वाढला आहे. यामुळे सोन्याची प्रत्यक्ष मागणी कमी होऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर भाव घसरले आहेत.
आगामी लग्नसराई आणि दीर्घकालीन नफ्याचा विचार करता ही घसरण सर्वसामान्य ग्राहक आणि गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीची संधी मानली जात आहे.
असे आहेत दर
24 कॅरेट : 1,40,600 रुपये (प्रति 10 ग्रॅम)
22 कॅरेट : 1,29,400 रुपये (प्रति 10 ग्रॅम)
चांदी : 1,84,000 (प्रतिकिलो)
Gold prices fall as Diwali ends
जिल्ह्यातील 4 लाख 47 हजार शेतकर्यांच्या खात्यावर पाच हजार नाशिक : प्रतिनिधी अनियमित पावसामुळे खरीप…
हनुमान चालीसा केंद्रांच्या माध्यमातून 25 कोटी लोकांपर्यंत आरोग्यसेवा : डॉ. प्रवीण तोगडिया नाशिकरोड : विशेष…
दीपावली सुट्टीमुळे राज्यासह परराज्यातून भाविक गडावर दाखल सप्तशृंगगड : प्रतिनिधी दिवाळीच्या सलग सुट्ट्यांमुळे साडेतीन शक्तिपीठांपैकी…
आजचे युग हे डिजिटल क्रांतीचे युग म्हणून ओळखले जाते. मोबाइल, इंटरनेट, ऑनलाइन बँकिंग, डिजिटल पेमेंट…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 च्या रात्री एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा…
नाशिक केंद्रावर 23 नाट्य संस्थांचा सहभाग नाशिक : प्रतिनिधी दिवाळीचा उत्साह ओसरल्यानंतर आता नाशिककर नाट्यरसिकांना…