नाशिक

सप्तशृंगगडावर दर्शनासाठी भाविकांची महागर्दी

दीपावली सुट्टीमुळे राज्यासह परराज्यातून भाविक गडावर दाखल

सप्तशृंगगड : प्रतिनिधी
दिवाळीच्या सलग सुट्ट्यांमुळे साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या आद्यस्वयंभू श्री क्षेत्र सप्तशृंगगडावर आदिमाया सप्तशृंगीदेवीच्या दर्शनासाठी राज्यभरातून व परराज्यातून भाविकांची प्रचंड मांदियाळी लोटली आहे. मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यभरातून, तसेच शेजारील गुजरात व मध्य प्रदेशातून मोठ्या संख्येने भाविक सुट्टीचा आनंद घेत देवीच्या दर्शनासाठी गडावर दाखल झाले आहेत. ‘सप्तशृंगी माता की जय’ आणि ‘बोल अंबे की जय’ या जयघोषाने संपूर्ण गड परिसर दुमदुमून गेला आहे.
गडावर गुरुवारपासूनच भाविकांची गर्दी सुरू झाली असून, शुक्रवारीही हा ओघ कायम होता. वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने भाविकांना मिळेल त्या ठिकाणी वाहने उभी करावी लागली. तेथून साधारणपणे एक ते दीड किलोमीटर अंतर पायी जात, त्यानंतर पायरी मार्गाने अथवा फ्युनिक्युलर रोप-वे ट्रॉलीच्या सहाय्याने भाविक दर्शनासाठी देवीच्या दरबारात पोहोचत
आहेत.
शुक्रवारी सकाळच्या सत्रात गर्दी काहीशी विरळ होती; मात्र सकाळी अकराच्या सुमारास भाविकांची अफाट गर्दी उसळली. पहिल्या पायरीपर्यंत लांबच लांब दर्शनरांगा लागल्या होत्या. दर्शनासाठी दोन ते तीन तासांचा अवधी लागत असला, तरीही भक्तांचा उत्साह आणि श्रद्धा तसूभरही कमी झालेली दिसत नव्हती.
व्यवस्था आणि स्थानिकांना लाभ,
दुसरीकडे फ्युनिक्युलर रोप-वे ट्रॉलीचे तिकीट घेण्यासाठी तिकीटघराबाहेर रांगा लागल्या होत्या. रोप-वेचा मॉल परिसर आणि रक्षा इमारतीच्या परिसरातही दर्शनासाठी गर्दी दिसून आली. वाढती गर्दी आणि कायदा-सुव्यवस्था लक्षात घेता श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट आणि पोलीस प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त ठेवला आहे. भाविकांच्या या गर्दीमुळे गडावरील पूजा साहित्य, प्रसाद, हॉटेल्स आणि इतर स्थानिक व्यावसायिकांच्या अर्थकारणाला गती मिळाली असून, व्यापार्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सुट्ट्यांचा हा काळ संपेपर्यंत गडावर भाविकांची अशीच तुडुंब गर्दी राहण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

Huge crowds of devotees at Saptashrunga Gad for ‘darshan’

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दुष्काळात बळीराजाला दिवाळी अग्रिमचा आधार

जिल्ह्यातील 4 लाख 47 हजार शेतकर्‍यांच्या खात्यावर पाच हजार नाशिक : प्रतिनिधी अनियमित पावसामुळे खरीप…

4 hours ago

कुंभमेळ्यात 10 हजार डॉक्टर देण्याची तयारी

हनुमान चालीसा केंद्रांच्या माध्यमातून 25 कोटी लोकांपर्यंत आरोग्यसेवा : डॉ. प्रवीण तोगडिया  नाशिकरोड : विशेष…

4 hours ago

सायबर फसवणुकीचे वाढते जाळे

आजचे युग हे डिजिटल क्रांतीचे युग म्हणून ओळखले जाते. मोबाइल, इंटरनेट, ऑनलाइन बँकिंग, डिजिटल पेमेंट…

4 hours ago

नोटबंदीच्या शक्यतेची चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 च्या रात्री एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा…

4 hours ago

दिवाळी संपताच सोन्याच्या दरात घसरण

ग्राहकांंची चांदी, आगामी लग्नसराई आणि गुंतवणुकीसाठी संधी नाशिक : प्रतिनिधी दीपोत्सवाचा उत्सव संपताच देशांतर्गत आणि…

4 hours ago

राज्य नाट्य स्पर्धेला 16 पासून प्रारंभ

नाशिक केंद्रावर 23 नाट्य संस्थांचा सहभाग नाशिक : प्रतिनिधी दिवाळीचा उत्साह ओसरल्यानंतर आता नाशिककर नाट्यरसिकांना…

5 hours ago