नाशिक केंद्रावर 23 नाट्य संस्थांचा सहभाग
नाशिक : प्रतिनिधी
दिवाळीचा उत्साह ओसरल्यानंतर आता नाशिककर नाट्यरसिकांना रंगभूमीवरील कलाविष्काराची मेजवानी अनुभवता येणार आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित 65 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा बिगुल वाजला आहे. येत्या 16 नोव्हेंबरपासून नाशिक केंद्रावर स्पर्धेला सुरुवात होणार आहे. यानिमित्त शहरातील विविध नाट्य संस्थांच्या तालमींना वेग आला असून, कलाकार संवादफेक, अभिनय, नेपथ्य, प्रकाशयोजना आणि रंगमंचावरील सादरीकरणाचा कसून सराव
करीत आहेत.
शहरातील परशुराम साईखेडकर नाट्यगृहात होणार्या या स्पर्धेत एकूण 23 नाट्यप्रयोग सादर होणार आहेत. 16 नोव्हेंबर ते 8 डिसेंबरदरम्यान दररोज सायंकाळी सात वाजता नाटकांचे प्रयोग होणार आहेत. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या नियोजनानुसार स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी नाट्यरसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हौशी कलाकारांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन केले आहे.
स्पर्धेतील नाट्यप्रयोगांचे वेळापत्रक
दि. 16 नोव्हेंबर : अनुभव मंटप, 17 नोव्हेंबर : पिवळी भिंत,
दि. 18 : दाह, 19 : केअरटेकर, 20 : खेळ, 21 : शेवंता जिनी हाय, 22 : मृत्यू आधीच आला होता, 23 : सलवा जुडूम, 24 : एक धुरंदर तीन बिलंदर, 25 : कातळवेळ, 26 : आमचा काळ मस्त होता, 27 : कळी बंद पाऊस, 28 : एक्सपायरी डेट, 29 : श्याम तुझी आईस इली रे, 30 नोव्हेंबर : द रेड पेन झाइड. दि. 1 डिसेंबर : बाग बेंच आणि बरेच काही, 2 : नेटवर्क प्रॉब्लेम, 3 : मेले कोण, 4 : हमीदाबाईची कोठी, 5 : रघुनाथ ब्लॉगपोस्ट, 6 : नथिंग टू से, 7 : आता कुठे धावे मन, 8 डिसेंबर 2026 : लेडीज सायकल.
State Drama Competition to begin from the 16th
जिल्ह्यातील 4 लाख 47 हजार शेतकर्यांच्या खात्यावर पाच हजार नाशिक : प्रतिनिधी अनियमित पावसामुळे खरीप…
हनुमान चालीसा केंद्रांच्या माध्यमातून 25 कोटी लोकांपर्यंत आरोग्यसेवा : डॉ. प्रवीण तोगडिया नाशिकरोड : विशेष…
दीपावली सुट्टीमुळे राज्यासह परराज्यातून भाविक गडावर दाखल सप्तशृंगगड : प्रतिनिधी दिवाळीच्या सलग सुट्ट्यांमुळे साडेतीन शक्तिपीठांपैकी…
आजचे युग हे डिजिटल क्रांतीचे युग म्हणून ओळखले जाते. मोबाइल, इंटरनेट, ऑनलाइन बँकिंग, डिजिटल पेमेंट…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 च्या रात्री एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा…
ग्राहकांंची चांदी, आगामी लग्नसराई आणि गुंतवणुकीसाठी संधी नाशिक : प्रतिनिधी दीपोत्सवाचा उत्सव संपताच देशांतर्गत आणि…