नाशिक

खरातच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुन्हा लांबणीवर

30 सप्टेंबरला पुढील सुनावणी

सिडको : प्रतिनिधी
महिलांचे लैंगिक शोषण तसेच आर्थिक फसवणुकीच्या विविध गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेल्या अशोक खरातच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी होणार होती. मात्र, नियमित न्यायालय रजेवर असल्याने दुसर्‍या न्यायालयात ही सुनावणी पार पडली. आता या अर्जावर 30 सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी
होणार आहे.
खरातविरुद्ध दाखल असलेल्या एका गुन्ह्यात जामीन मिळावा, यासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज करण्यात आला आहे. या अर्जावरील सुनावणी सलग दुसर्‍यांदा पुढे ढकलण्यात आली आहे. बुधवारी झालेल्या सुनावणीवेळी सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम
उपस्थित होते.
दरम्यान, अशोक खरात सध्या मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. त्याच्याविरुद्ध दाखल विविध गुन्ह्यांचा तपास विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) सुरू आहे. जामीन अर्जावरील पुढील सुनावणी 30 सप्टेंबर रोजी होणार असल्याने त्याकडे लक्ष लागले आहे.

Hearing on Kharat’s bail application adjourned again.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

3 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

3 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

3 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

3 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

4 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

4 hours ago