शेतकरी हवालदिल;भाजीपाला शंभरी पार
मनमाड : प्रतिनिधी
काही भागात झालेली अतिवृष्टी, खराब हवामान तसेच सध्या सुरू असलेला पितरपाठ यामुळे छोट्यापासून मोठ्या शहरापर्यंत भाजीपाल्याच्या भावात मोठी वाढ झाली असल्याचे चित्र आहे. पेट्रोल, डिझेल, गॅसपाठोपाठ आता भाजीपालादेखील महाग झाला आहे. सर्वच भाजीपाल्याने प्रतिकिलो शंभरी गाठली आहे. मांस, मच्छी, मटण, तेल, डाळी यांचे भावदेखील मोठ्या प्रमाणात वधारले आहेत.
याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असून, त्यांचे बजट कोलमडले तर दुसरीकडे दोन महिन्यांपूर्वी भाजीपाल्याचे दर इतके कोसळले होते की, ते फेकून देण्याची वेळ शेतकर्यांवर आली होती. आता शेतकर्यांच्या मालाला भाव चांगला मिळतोय, मात्र बदलत्या हवामानाचा फटका पिकांना बसून उत्पादनात घट झाल्याने भाववाढ होऊनदेखील शेतकर्यांच्या पदरी निराशाच आहे.
सध्या देशभरात महागाईचा आगडोंब उठला आहेे. पेट्रोल आणि डिझेलने शंभरी पार केली असून, घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत ही मोठी वाढ झाली आहे. मटणाचे भाव प्रतिकिलो 800 रुपये तर कोंबडीच्या मटणाचे भावदेखील प्रतिकिलो 200 रुपयांच्या उंबरठ्यावर आले आहे. वाढत्या महागाईचा सर्वांत जास्त फटका हा गोरगरीब, मजूर आणि रोज कमवून खाणार्यांना बसत आहे असून, जितक्या वेगाने महागाई वाढत आहे तेवढ्या वेगाने कमाई वाढत नसल्यामुळे अनेकांना जीवन जगणे कठीण झाले आहे. गोरगरीब व मजुरापासून मध्यम वर्गीयांपर्यंत भाजीपाला एकमेव स्वस्त होता, मात्र इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीसोबत आता भाजीपालादेखील महागला आहे. यंदा अतिवृष्टीमुळे त्याचा फटका इतर पिकांसोबत भाजीपाल्याला बसला आहे. त्यामुळे आवक कमी तर मागणी जास्त, अशी परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे भावात वाढ झाली असल्याचे व्यापार्यांनी सांगितले. भाजीपाल्याच्या भावात वाढ होऊनदेखील उत्पादनात घट झाल्यामुळे खर्चदेखील निघत नसल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे.
- अॅड. प्रतीक्षा चौधरी पावसाळ्याची सकाळ होती. सगळीकडे चिंब असं वातावरण झालेलं होतं. आज आमच्या…
- अमोल जगताप नाशिकमध्ये नुकतीच घडलेली एक हृदयद्रावक घटना संपूर्ण समाजाला अंतर्मुख करून गेली. प्रेमसंबंधातून…
- प्रा. योगेश हांडगे आजच्या घरात, महाविद्यालयात, कार्यालयात किंवा समाजात एक पिढी सतत चर्चेत आहे-जेन…
आमदार डॉ. राहुल आहेरांंच्या पाठपुराव्याला यश; लोकार्पण, जलपूजन चांदवड : वार्ताहर तालुक्यातील वडबारे येथील तांबटी…
परीक्षा म्हणजे केवळ गुणांची स्पर्धा नसते; ती विद्यार्थ्यांच्या मेहनतीची, प्रामाणिकतेची आणि भविष्यातील संधींची खरी कसोटी…
फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सची कंपनी असलेल्या मेटा कंपनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…